PVR CinePolis : भारतातील आघाडीची मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर आणि मेक्सिकन कंपनी सिनेपोलिस भारतातील स्थानिक युनिटच्या विलीनीकरणा साठी चर्चेच्या प्रगत टप्प्यात आहेत. 'इकॉनॉमिक टाईम्स'मधील बातमीनुसार, हा करार वेगाने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. जर हा करार झाला तर एवढी मोठी कंपनी उदयास येईल जिच्या 1200 पेक्षा जास्त स्क्रीन असतील.


विलीनीकरण कराराला अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. पण आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणानंतर सिनेपोलिस कंपनीत सुमारे 20 टक्के हिस्सेदारी असलेली सर्वात मोठी शेअरहोल्डर असे असं इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीमध्ये म्हणण्यात आलं आहे


पीव्हीआरचे प्रवर्तक विलीन झालेल्या संस्थेमध्ये 10-14 टक्क्यांच्या दरम्यान असतील. पीव्हीआरचे सीएमडी अजय बिजली यांना किमान तीन वर्षे कंपनीचे व्यवस्थापन नियंत्रण पूर्ण करावे लागेल असं या अहवालात म्हटलं आहे.


विलीन झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळात सिनेपोलिसच्या संचालकांचा समावेश असेल. या करारावर दोन्ही बाजू वेगाने काम करत आहेत. या विलीनीकरणासाठी भारतीय स्पर्धा आयोगाच्या मान्यतेचीही गरज भासणार नाही कारण कोविड-19 मुळे आलेल्या मंदीमुळे या दोन कंपन्यांची एकत्रित कमाई यावर्षी 1000 कोटी रुपयांपेक्षा कमी झाली आहे.


पीव्हीआरची एकूण 182,000 आसन क्षमता असलेल्या 846 स्क्रीन सह 71 भारतीय आणि श्रीलंकन शहरांमधील 176 मल्टिप्लेक्समध्ये कार्यरत आहे. सिनेपोलिस भारतातील 22 राज्यांमधील 61 ठिकाणी 93 मल्टिप्लेक्समध्ये 417 स्क्रीन चालवते. या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणा मुळे 269 साइट्सवर 1,263 स्क्रीन होतील. कंपनीच्या स्पर्धक INOX Leisure कडे 72 शहरांमधील 160 मल्टिप्लेक्समध्ये 675 स्क्रीन आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha