Share Market Crash : रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहे. जगभरातील महत्त्वाचे शेअर बाजार घसरले आहेत. सोमवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. युद्धामुळे लागलेल्या आगीत शेअर बाजारातील गुंतवणूकदार होरपळले आहेत. सोमवारी दुपारपर्यंत गुंतवणूकदारांचे जवळपास 6 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
जागतिक पातळीवर झालेल्या पडझडीचा परिणामन देशांतर्गत शेअर बाजारावर झाला आहे. सोमवारी गुंतवणूकदारांना 6,32, 530 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalization) सोमवारी 2,46,79,421.28 कोटी रुपये होते. बाजारातीस घसरणीमुळे बाजार भांडवल 2,40,46,891 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. परदेशी गुंतवणूकदारांना 4 मार्च 2022 पर्यंत 7,631 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.
सकाळी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरला होता. ही घसरण 1900 अंकांपर्यंत गेली होती. दुपारच्या सुमारास बाजारातील घसरणीला काही प्रमाणात ब्रेक लागला होता. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1658 अंकांची घसरण झाली होती. तर, निफ्टीमध्ये 442 अंकाची घसरण झाली होती.
कच्च्या तेलाचे दर 139 डॉलर प्रति बॅरल पार
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं (Russia Ukraine War) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी (Crude Oil Price) उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी 2008 नंतर पहिल्यांदाच सर्वोच्च पातळी गाठली आहे. ब्रेंट क्रूडचे दर 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर 147 डॉलर प्रति बॅरल इतका विक्रमी होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Gold-Silver Price Today : सोन्याचा भाव आज 54 हजारांवर, युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम
- GST: महागाईच्या झळा वाढणार! जीएसटी कर वाढण्याचे संकेत, असे असतील नवे दर?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha