Richest person world : जगातील सर्वात जास्त श्रीमंतांच्या यादीत अबुधाबीच्या राजघराण्याचे प्रिन्स मोहम्मद बिन जायद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) यांनी आघाडी घेतली आहे. ते जगातील सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. अल नाहयान यांनी जेफ बेझोस आणि वॉरन बफे यांना मागे टाकलं आहे. त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
जेव्हा आपण जगातील सर्वात श्रीमंत लोकांबद्दल बोलतो तेव्हा कधी एलन मस्कचे नाव घेतले जाते. तर कधी मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचे नाव भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समाविष्ट केले जाते. पण या दिग्गजांना एका व्यक्तीनं मागे टाकलं आहे. अबुधाबीच्या राजघराण्याचे प्रिन्स अल नाहयान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील सर्वात मोठे श्रीमंत लोक त्याच्या एकूण संपत्तीशी जवळही नाहीत. त्याच्या संपत्तीनेॲमेझॉनचे मालक जेफ बेझोस आणि जगातील अव्वल गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना मागे टाकले आहे. 305 अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह, अल नाहयान श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर आहेत. अल नाहयान यांची यशोगाथा विविध व्यवसायांमध्ये केलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीसाठी ओळखली जाते.
सर्वात श्रीमंत कुटुंबाचा प्रमुख
UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांना 18 भाऊ आणि 11 बहिणी आहेत. अल नाहयान यांना नऊ मुले आणि 18 नातवंडे आहेत. अल नाहयान राजघराण्याकडे 305 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2538667 कोटींची संपत्ती आहे. वॉलमार्ट इंकला मागे टाकून 2023 मध्ये अल नाहयान हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहे. या कुटुंबाकडे जगातील सुमारे सहा टक्के तेलसाठा, मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब आणि अनेक प्रसिद्ध कंपन्यांमध्ये भागभांडवल आहे.
अंबानी-अदानींच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त
नाहयान रॉयल फॅमिलीची संपत्ती इतकी आहे की, ती भारतातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीच्या कितीतरी पटीने जास्त आहे. मुकेश अंबानी कुटुंबाची संपत्ती 101 अब्ज डॉलर (सुमारे 8.4 लाख कोटी रुपये) आहे आणि गौतम अदानी कुटुंबाची संपत्ती 91.8 अब्ज डॉलर (सुमारे 7.63 लाख कोटी रुपये) आहे. अशाप्रकारे दोघांची एकूण संपत्ती केवळ 16 लाख कोटी रुपये आहे. या दोघांच्या संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त संपत्ती ही नाहयान रॉयल फॅमिलीची आहे.
महत्वाच्या बातम्या: