मुंबई : वर्ष 2021 मध्‍ये जगातील प्रमुख निवासी बाजारपेठांच्‍या किंमतींमध्‍ये 2 टक्‍क्‍यांनी वाढ होण्‍याची अपेक्षा नाइट फ्रँक अहवालातून समोर आली आहे. नाइट फ्रँक या आघाडीच्‍या आंतरराष्‍ट्रीय मालमत्ता सल्‍लागार कंपनीने त्‍यांच्‍या 'प्राइम ग्‍लोबल फोरकास्‍ट 2021'मध्‍ये ही माहिती दिली. 22 शहरांमधील (सरासरी) प्रमुख निवासी किंमती वर्ष 2020 मध्‍ये स्थिर राहण्‍याची, तसेच वर्ष 2021 मध्‍ये 2 टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


प्रमुख निवासी बाजारपेठ मुंबईमध्‍ये वर्ष 2021 मध्‍ये (डिसेंबर 2020 ते डिसेंबर 2021) वार्षिक किंमतीत 0.0 टक्‍के बदल होण्‍याची अपेक्षा असली तरी प्रमुख मालमत्तांसाठी मागणीमध्‍ये वाढ होण्‍याचा अंदाज आहे. शांघाय व केपटाऊन वर्ष 2021 मध्‍ये किंमतीत 5 टक्‍के वाढ होण्‍याच्‍या अंदाजासह वर्ष 2021साठी अंदाजामध्‍ये अग्रस्‍थानी आहेत. तसेच ब्‍यूनोस आयर्स याच वर्षामध्‍ये प्रमुख निवासी किंमतीत -8.0 टक्‍क्‍यांनी घट होत सर्वात कमकुवत कामगिरी करणारे जागतिक शहर असण्‍याचा अंदाज आहे.


नाइट फ्रँकच्‍या संशोधन विश्‍लेषणाला 22 शहरांपैकी 20 शहरांत किंमती वर्ष 2021 मध्‍ये स्थिर राहण्‍याची किंवा वाढण्‍याची अपेक्षा आहे आणि ट्रेण्‍ड वर्ष 2020 मध्‍ये दिसण्‍यात आलेल्‍या ट्रेण्‍डपेक्षा काहीसा भिन्‍न असेल. विश्‍लेषकांना नऊ शहरे कमी किंमतींसह वर्षाचा शेवट करण्‍याची अपेक्षा आहे.


भावी दिशा : वर्ष २०२१ मध्‍ये मागणी, पुरवठा व विक्री आकारांमध्‍ये कशाप्रकारे बदल होईल?


या अंदाजाव्‍यतिरिक्‍त नाइट फ्रँकने त्‍यांच्‍या प्राइम ग्‍लोबल सिटीज इंडेक्‍स क्‍यू3 2020 च्‍या माध्‍यमातून प्रमुख निवासी बाजारपेठांसाठी 12 महिने (वार्षिक) व 3 महिने (तिमाही) किंमतीमध्‍ये बदल होण्‍याबाबत सांगितले आहे. अहवाल 45 शहरांमधील प्रमुख किंमतींमधील बदलावर देखरेख ठेवतो. वर्षापूर्वी इंडेक्‍स प्रतिवर्ष 1.1 टक्‍क्‍यांनी वाढले आणि सप्‍टेंबर 2020 अखेरपर्यंत 1.6 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले.


प्रमुख भारतीय बाजारपेठांसाठी मुख्‍य निरीक्षणे :


दिल्‍लीच्‍या प्रमुख निवासी बाजारपेठेने मुंबई व बेंगळुरूच्‍या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी केली. जागतिक स्‍तरावर शहराचा 27 क्रमांक आहे. 2019 ची तिसरी तिमाही ते 2020 ची तिसरी तिमाही या कालावधीसाठी वार्षिक किंमत बदल 0.2 टक्‍के राहिला. 2020च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये मागील तिमाहीच्‍या तुलनेत किंमतीत 0.1 टक्‍क्‍यांची घट झाली.


मुंबई शहराचा 33वा क्रमांक आहे. 2019 ची तिसरी तिमाही ते 2020 ची तिसरी तिमाही या कालावधीसाठी वार्षिक किंमत बदल -1.3 टक्‍के राहिला. शहराने 2020च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये मागील तिमाहीच्‍या तुलनेत किंमतीत 0.7 टक्‍क्‍यांची घट नोंदवण्यात आली.


बेंगळुरू शहराचा 34वा क्रमांक आहे. 2019 ची तिसरी तिमाही ते 2020 ची तिसरी तिमाही या कालावधीसाठी वार्षिक किंमत बदल 1.4 टक्‍के राहिला. शहराने 2020च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये मागील तिमाहीच्‍या तुलनेत किंमतीत -1.5 टक्‍क्‍यांची घट नोंदवण्यात आली.