Tomato price News : सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना (Tomato Farmers) चांगले दिवस आले आहेत. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कांदा आणि बटाट्यापाठोपाठ आता टोमॅटोच्याही दरात वाढ झाल्यानं, शेतकऱ्यांना फायदा होत आहेत. तर दुसरीकडे ग्राहकांना थोडा फटका बसत आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यात टोमॅटोचे दर दुपटीने वाढले आहेत. त्याचा परिणाम उत्तरेत फारसा दिसत नसला तरी येत्या काही दिवसांत देशभरात टोमॅटोच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.


टोमॅटोच्या दरात वाढ होण्याचं कारण काय?


काही दिवसांपूर्वी कांदा आणि बटाट्याच्या दरात वाढ झाली होती. आता टोमॅटोचे भाव वाढ झाली आहे. विशेष म्हणजे देशाच्या अनेक भागात टोमॅटोचे भाव दोन ते तीन आठवड्यांत दुपटीने वाढले आहेत. टोमॅटोच्या दरातील वाढ ही महाराष्ट्रासह दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये दिसून आली आहे. वाढती उष्णता आणि कमी उत्पादन हे टोमॅटोच्या दरात वाढ होण्याचं कारण आहे.


टोमॅटोचा दर 40 ते 50 रुपये किलोवर


मिळालेल्या माहतीनुसार, घाऊक बाजारात टोमॅटोचा सरासरी दर 40 ते 50 रुपये किलोवर पोहोचला आहे. मात्र, कडक उन्हामुळं वेगानं पिकणाऱ्या टोमॅटोचा अतिरिक्त पुरवठा होत असल्यानं उत्तर भारतातील राज्यांमध्ये टोमॅटोच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, दक्षिण भारतात टोमॅटोचा पुरवठा आणि वाढतं ऊन यामुळं टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.


दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ


दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोच्या सरासरी घाऊक किमती 35 ते 50 रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहेत, तर कर्नाटकातील काही बाजारपेठांमध्ये टोमॅटोचे दर 60 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या दोन-तीन आठवड्यांमध्ये आणि एक वर्षापूर्वीच्या तुलनेत किमती जवळजवळ दुप्पट झाल्या आहेत. बंगळुरूमध्ये रविवारी टोमॅटोची किरकोळ विक्री 80 रुपये किलोने होत होती.


उत्तरेकडील राज्यांमध्ये किमती कमी 


यावर्षी तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस इतके राहिले. त्यामुळे फुले व फळे खराब झाली. त्यामुळं उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. उत्तर भारतात किमती अजूनही नियंत्रणात आहेत. उत्तरेकडील राज्ये अद्यापही उष्णतेच्या प्रभावाखाली असल्याने टोमॅटो झाडांवर वेगाने पिकत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची काढणी करावी लागत आहे. त्यामुळे बाजारपेठेत पुरवठा वाढतो आहे. त्यामुळं तिथे किंमती नियंत्रणात आहेत.


उष्णतेमुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम 


टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेमुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. बंगळुरु प्रदेशाच्या आसपास काढण्यात येणारे नवीन पीक टोमॅटोचे भाव येत्या काही दिवसात ठरवेल. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान टोमॅटोचे भाव उच्चांकावर असतात. पावसाळ्यात टोमॅटोचे पीक अगदी लहान भागात घेतले जाते. पावसाळ्यात अत्यंत मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान होतं. त्यामुळं पुरवठा कमी असतो परिणामी दरात वाढ होते.


महत्वाच्या बातम्या:


महागाईचा भडका! वर्षभरात बटाटा, कांदा, टोमॅटोच्या दरात किती झाली वाढ? सविस्तर माहिती एका क्लिकवर