Prashant Kishor News : निवडणूक रणनीतीकार (Election Strategist) आणि जन सुराज अभियानाचे शिल्पकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मोठी घोषणा केली आहे. बिहारमधून नोकरीसाठी, रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या तरुणांना बिहारमध्ये (Bihar) रोजगार देणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी बेरोजगार तरुणांना 10 ते 12 हजार रुपयांचा रोजगार देणार असल्याचे जाहीर केलं आहे.  


बिहारमधील लोकांना रोजगाराच्या शोधात देशाच्या इतर राज्यात जावे लागते. स्थलांतर ही या राज्यातील सर्वात मोठी समस्या आहे. या बेरोजगार तरुणांना प्रशांत किशोर यांनी मोठा दिलासा देण्याचं आश्वासन दिलं आहे. तरुण बेरोजगार असल्याने बिहारमधून नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्या तरुणांना येथे रोजगार देणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले. बिहारच्या विकासाच्या रोडमॅपवरही ते बोलले. 


राज्यातच तरुणांना नोकऱ्या देण्याचा संकल्प 


प्रशांत किशोर म्हणाले की, जन सुराजचा पहिला संकल्प हा 2025 मध्ये वर्षभरात नाले, रस्ते, शाळा, रुग्णालये बांधली जातील की नाही यापेक्षा नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरुणांना आणि बेरोजगारांना काम दिले जाईल. बिहारमध्येच 10 ते 12 हजार रुपयांचा रोजगार दिला जाईल. 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान 5 जागतिक दर्जाच्या शाळा बांधण्याचा दुसरा संकल्प असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.  


वृद्धांना 2000 रुपये पेन्शन देण्याची घोषणा 


राजकीय विश्लेषक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सध्या बिहार सरकार 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दरमहा 400 रुपये देते. ज्या दिवशी ही व्यवस्था अस्तित्वात आली, त्या दिवशी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्री-पुरुषांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन दिली जाईल. 


महत्वाच्या बातम्या:


नितीश कुमार यांनी मोदी मंत्रिमंडळात मोठं मंत्रालय का मागितलं नाही? प्रशांत किशोर यांचा खळबळजनक खुलासा