PM Kisan Samman Nidhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 16 हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये एका कार्य्रमात हा निधी वितरीत करण्यात आला. दरम्यान, देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा झालेला नाही. नेमका हा हप्ता अनेक शेतकऱ्यांना का मिळाला नाही? आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं? यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात.   


PM किसान योजनेचा 16 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2 हजार रुपये हस्तांतरित केले आहेत. देशभरातील करोडो शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच सरकारकडून सांगण्यात आले होते की, पीएम किसान योजनेचा हप्ता 28 फेब्रुवारीला जारी केला जाईल. मात्र, पंतप्रधान किसान योजनेचा हा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचू शकला नाही, त्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की, पंतप्रधान किसान योजनेचा प्रलंबित हप्ता त्यांच्या खात्यात येणार की नाही.


हप्ता न मिळण्याचे कारण काय?


ज्या शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेतील 2000 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यावर पोहोचला नाही, त्यांनी घाबरण्याची गरज नाही. जर तो शेती करत असेल आणि त्याच्याकडे स्वतःची जमीन असेल तर हा हप्ता त्याच्या खात्यात नक्कीच येईल. अनेक कारणांमुळं तुमचा हप्ता अडकला आहे. याची तीन मोठी कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण न होणे. दुसरे कारण जिओ-व्हेरिफिकेशन असू शकते, तिसरे कारण बँक खात्याशी आधार लिंक न करणे हे असू शकते. ही प्रक्रिया ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे, त्या या योजनेचा लाभ मिळालेला आहे. 


या  हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा


आपले रखडलेले हप्ते कसे परत मिळणार या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काही हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, लाभार्थी शेतकरी 155261, 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तुम्ही या टोल फ्री नंबरवर कॉल करून सर्व प्रकारची माहिती मिळवू शकता आणि मदत मागू शकता. येथे तुम्हाला तुमचा हप्ता का अडकला हे सांगितले जाईल. याशिवाय, पीएम किसान संतृप्ती मोहीम देखील सरकारद्वारे चालवली जाते. ज्यामध्ये शेतकरी त्यांच्या खात्यातील प्रत्येक चूक सुधारू शकतात. ही मोहीम ई-केवायसीसाठी चालवली जाते, ज्यांचे हप्ते अडकले आहेत ते शेतकरीही यात सहभागी होऊ शकतात.


महत्वाच्या बातम्या:


PM किसानचा 16 वा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही? कुठे कराल चेक