Deepika Padukone Ranveer Singh :  प्रेग्नेंट असल्याची बातमी दिल्यानंतर दीपिका (Deepika Padukone) ही अभिनेता रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. तर, विमानतळावर पॅपाराजींनी तिच्यावर पुष्पगुच्छ देत शुभेच्छांचा वर्षाव केला.या अनपेक्षित स्वागताने दीपिका-रणवीरही भारावून गेले. यावेळी पॅपाराजींनी आम्ही आता मामा झालो, असे म्हटले. 


गुरुवारी, रणवीर-दीपिकाने चाहत्यांना गोड बातमी देत नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती दिली. त्यानंतर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडसह चाहत्यांनीदेखील दीपिका-रणवीरला शुभेच्छा दिल्या. गुरुवारी, 29 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दीपिका-रणवीर मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावणार आहेत. 


पॅपाराजींकडून दीपिका-रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव


पॅपाराजींनी विमानतळावर आलेल्या दीपिका-रणवीरला शुभेच्छा दिल्या. या दोघांना पुष्पगुच्छ देण्यात आला.  त्याशिवाय केकही कापण्यात आला. दीपिकाने केकचा एक तुकडा घेतला आणि रणवीरला भरवला. पॅपाराजींनी यावेळी आम्ही मामा होणार म्हटले. 






दीपिका-रणवीरने दिली गुड न्यूज 


बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्याने त्यांच्या प्रेग्नेन्सीची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. यानंतर या दोघांच्या चाहत्यांना एकच आनंद झाला आहे. अनेक कलाकारांनी या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे. चाहत्यांनी देखील रणवीर-दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दीपिका वयाच्या 37 व्या वर्षी आई होणार आहे. 






 


दीपिकाचे आगामी चित्रपट 


दीपिका या वर्षी जानेवारीत रिलीज झालेल्या 'फायटर'मध्ये  दिसली होती. या चित्रपटात तिने पहिल्यांदा हृतिक रोशनसोबत काम केले. त्याशिवाय, 'सिंघम अगेन'या अॅक्शनपटासह 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातही झळकणार आहे. 


इतर संबंधित बातम्या: