Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांमध्ये या सीझनची चांगलीच उत्सुकता आहे. कार्यक्रमासंदर्भात दररोज नव-नवीन अपडेट्स समोर येत आहेत. शोमध्ये यंदा काही नवे बदल करण्यात आले आहेत. 'बिग बॉस ओटीटी 3' हा कार्यक्रम यंदा सलमान खान (Salman Khan) नव्हे तर अनिल कपूर (Anil Kapoor) होस्ट करणार आहे. प्रेक्षक काही दिवसांपासून कार्यक्रमाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा करत आहेत.'बिग बॉस ओटीटी 3' हे पर्व खूपच कमाल असणार आहे. अशातच आता या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमो शेअर करत निर्मात्यांनी प्रीमिअर डेटची घोषणा केली आहे. यंदाचा खेळातील नियम बदलण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
'बिग बॉस ओटीटी 3'चा प्रोमो आऊट!
'बिग बॉस ओटीटी 3'चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये अनिल कपूरचा स्वॅग पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये अनिल कपूर म्हणत आहे,"सबने पूछा अब क्या ही बाकी है AK, भला, बुरा, खरा, खोटा, पानी, आग, गाली, ताली, सब देखा...सब सुना, अब मेरी बारी, रूल नया गेम वही, लडेंगे, भिडेंगे, चिढेंगे, टिकेंगे पता नहीं, थोडा लॉजिक..थोडा मॅजिक..बहुत हो गया झक्कास, अब करते हैं न कुछ और खास, अब सब बदलेगा". यावेळचा प्रोमो खूप वेगळा आहे. अनिक कपूरने पाण्यातही शूट केलं आहे.
'बिग बॉस ओटीटी 3' कधी होणार सुरू?
'बिग बॉस ओटीटी 3'चा प्रोमो शेअर करत जिओ सिनेमाने लिहिलं आहे,"तापमान बदलणार..AK च्या येण्याने..आता सगळं बदलेल. या खास सीझनसाठी तयार व्हा. 'बिग बॉस ओटीटी 3' अनिल कपूरसोबत पाहा. जिओ सिनेमावर 21 जूनपासून रात्री 9 वाजता".
'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'हे' स्पर्धक असतील
मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस ओटीटी 3'साठी शिवांगी जोशी, अहाना देओल, भव्या गांधी, शीझान खान, हर्षद चोप्रा, शहजादा धामी, प्रतीक्षा होंमुखे, वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित, अरमान मलिक, कृती सेननची बहिण नुपूर सेनन, संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त, तनुश्री दत्ता आमि हेमा मालिनी यांची मुलगी अहाना देओलला विचारणा झाली आहे. अद्याप अधिकृतरित्या कोणाचंही नाव समोर आलेलं नाही.
संबंधित बातम्या