Relationship Tips : नातं कोणतंही असो, नात्याचा धागा फार नाजूक असतो. या नात्याचा पाया हा विश्वास, प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर आणि निष्ठा यावर अवलंबून असतो. यापैकी एकही गुण नात्यात नसतील तर नाते तुटू शकते. एखादं नातं आयुष्यभर जपायचं असल्यास काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे असते, असं म्हणतात की, तुमचं नातं मजबूत राहण्यासाठी नात्यात जोडीदारापासून काहीही लपवू नये, सर्व काही शेअर केले पाहिजे, गोष्टी लपवल्याने नात्यात अंतर निर्माण होऊ शकते. पण, प्रत्येक वेळी असेच होईल असे नाही, कधी कधी काही गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवाव्यात. अशा काही गोष्टी आहेत ज्या गुप्त ठेवल्या पाहिजेत, त्या जोडीदाराला सांगितल्याने त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत? ज्या तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कधीही शेअर करू नये. (lifestyle News)
तुमच्या पार्टनरला चुकूनही सांगू नका, अशा काही गोष्टी
तुमच्या पार्टनरला काही वेळेस काही गोष्टी न सांगितलेल्या चांगल्या ठरतील, तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या पूर्वीच्या नातेसंबंधांचा उल्लेख कधीच करू नका. जर तुमचे वैवाहिक जीवन चांगले चालले असेल. लग्नाला चार-पाच वर्षे झाली असतील, तर तुमच्या पूर्वीच्या नातेसंबंधांचा कधीही उल्लेख करू नका. भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल बोलणे, अगदी मस्करी करणे, तुमच्या जोडीदाराला दुखवू शकते. विशेषत: आपल्या बायको आणि मैत्रिणींच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल जाणून घेतल्यानंतर मुलांना ते सहजासहजी सहन होत नाही. हेल्दी रिलेशनशिपसाठी तुम्ही दोघांनीही तुमच्या जुन्या नात्याबद्दल एकमेकांना सांगू नका हे महत्त्वाचे आहे.
कुटुंबाबद्दल काही बोलताना सावधान...
जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाबद्दल काही तक्रारी असतील तर, त्या जोडीदाराला सांगताना थोडं सांभाळून सांगा, कुटुंबातील कोणत्याही सदस्याची वागणूक, बोलण्याची पद्धत, वागणूक, राहणीमान आवडत नसेल तर ते व्यक्त करू नका. त्याची चेष्टा करू नका, मनात ठेवा. यामुळे तुमच्या पार्टनरला वाईट वाटू शकते. त्यांना वाटेल की तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा आदर करत नाही. विशेषत: तुमच्या सासरच्या लोकांबद्दल चांगले किंवा वाईट बोलू नका, कारण चिडून तुमचा जोडीदार तुमच्या आईवडिलांबद्दल नकारात्मक गोष्टीही बोलू शकतो. एकमेकांच्या पालकांचा आदर करणे चांगले. त्यांच्या कमतरता काढत बसू नका.
जोडीदाराबद्दल वाईट बोलू नका
जसं की सर्वांनाच माहित आहे, आपल्या सर्वांमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात. प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते. काही चांगल्या आणि काही वाईट सवयी असतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची कोणतीही गोष्ट आवडत नसेल किंवा त्याच्या सवयी आवडत नसतील, तर असे वारंवार बोलून त्याची चेष्टा करू नका. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याच्या उणिवा वारंवार सांगितल्या तर त्याला वाईट वाटू शकते. यामुळे ते तुमच्यापासून दूर राहू लागतील. त्यांचा आत्मविश्वास आणि अहंकार दुखावला जाऊ शकतो.
आधीच्या जोडीदाराचा चांगुलपणा सांगू नका
तुमचं नातं तुम्हाला दीर्घकाळ टिकवायचं असेल तर तुमच्या आधीच्या जोडीदाराची चांगली बातमी तुमच्या आताच्या जोडीदारासोबत किंवा प्रियकर, मैत्रिणीसोबत नेहमी शेअर करू नका. जर तुमचा ब्रेकअप झाला असेल तर तुमच्या सध्याच्या जोडीदाराशी त्याचा उल्लेख केल्याने त्यांना त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या माजी व्यक्तीचा उल्लेख करत राहिल्यास, तुमच्या जोडीदाराला असे वाटेल की तुम्ही अजूनही त्याच्या/तिच्या आठवणींमध्ये आहात. आपण सध्याच्या नात्यात आनंदी नाही, ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतो. या सर्व गोष्टी मुलं आणि मुली दोघांनाही लागू होतात.
जोडीदाराबद्दल चुकीचे मत
तुमच्या मित्रांपैकी एकाला तुमच्या जोडीदाराच्या काही सवयी किंवा गुण आवडत नसतील, तर अशा परिस्थितीत या गोष्टी तुमच्या जोडीदाराला सांगू नका, त्या स्वतःसाठी गुप्त ठेवा. तुम्ही असे न केल्यास तुमच्या जोडीदाराचे मन दुखवू शकते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Relationship Tips : आणखी काय हवं! तुमचा जोडीदार इतकं Attention देईल, तुमच्याशिवाय पान हलणार नाही, फक्त 'या' टिप्स फॉलो करा