Poultry industry : भारतीय पोल्ट्री उद्योग एव्हियन इन्फ्लूएंझापासून (HPAI) म्हणजे बर्ड फ्लूपासून  (bird flu) मुक्त झाल्याच्या स्वयंघोषणेला जागतिक पशु आरोग्य संघटनेने दिली मान्यता दिली आहे. ही एक मोठी बातमी असून, आमच्या पोल्ट्री क्षेत्रासाठी निर्णायक ठरेल असे मत केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केलं. बर्ड फ्लूमुळं पोल्ट्री उद्योगाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं.  या स्वयंघोषणेला मान्यता मिळाल्यानं जागतिक बाजारपेठेत भारतीय पोल्ट्रीसाठी नवीन संधी खुल्या होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळं देशाच्या आर्थिक वाढीला हातभार लागेल.


भारतातील एव्हियन इन्फ्लूएंझा


अत्यंत रोगजन्य एव्हियन इन्फ्लुएंझा (एच पी ए आय), जो सामान्यत: बर्ड फ्लू म्हणून ओळखला जातो, तो भारतात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी 2006 मध्ये आढळला होता. तेव्हापासून, देशाने विविध क्षेत्रांमध्ये एच पी ए आय चा उद्रेक दरवर्षी अनुभवला आहे. त्यामुळं  मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या रोगाची नोंद झाली आहे. परिणामी त्याच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी  9 दशलक्ष पक्षी मारले गेले आहेत.


भारतात  एच पी ए आय नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा एव्हियन इन्फ्लूएंझा (सुधारित - 2021) मध्ये प्रतिबंध, नियंत्रण आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी नमूद केल्यानुसार "शोधा आणि बाजूला काढा" धोरणाचे अनुसरण केले जाते. या सर्वसमावेशक प्रतिसादामध्ये संक्रमित प्राणी आणि त्यांच्या सानिध्यात आलेले प्राणी, अंडी, खाद्य, कचरा आणि इतर दूषित पदार्थांचा मानवी पद्धतीने नाश करणे यांचा समावेश आहे.  याव्यतिरिक्त, पोल्ट्री आणि पोल्ट्री उत्पादनांच्या हालचालींवर प्रतिबंध, निर्जंतुकीकरण आणि संक्रमित परिसर स्वच्छ करणे आणि पोस्ट-ऑपरेटिव्ह देखरेख योजना  (POSP) यासारख्या उपायांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एच पी ए आय विरुद्ध लसीकरणास भारतात परवानगी नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.


क्षेत्र निश्चिती आणि विभागीकरण ही धोरणात्मक साधने असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि रोग प्रतिबंध किंवा रोग नियंत्रणाच्या उद्देशाने विशिष्ट आरोग्य स्थिती असलेल्या प्राण्यांच्या गटांची स्थापना आणि देखरेख करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. विभागीकरणामध्ये राष्ट्रीय प्रदेशात विशिष्ट आरोग्य स्थिती असलेल्या प्राण्यांची उप-लोकसंख्या परिभाषित करणे समाविष्ट आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवणे हे  जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या स्थलीय संहिता आणि विशिष्ट रोग प्रकरणांशी संबंधित शिफारशींमध्ये नमूद केलेल्या मानकांचे पालन करणाऱ्या कठोर व्यवस्थापन आणि पालन पद्धतींवर अवलंबून आहे. प्राण्यांचे आरोग्य चांगले राहावे, विभागाच्या आत आणि बाहेर रोगाचा उद्रेक होण्याचा धोका कमी व्हावा.  पोल्ट्री आणि पोल्ट्री उद्योगाशी संबंधित व्यवहार सुरळीत सुरु राहावेत यासाठी विभागीकरण हा एक अत्यंत महत्वाचा उपाय आहे.


देशातील चार राज्यांमध्ये हे पोल्ट्री कंपार्टमेंट


भारतात महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये हे पोल्ट्री कंपार्टमेंट आहेत. जागतिक पशु आरोग्य संघटनेने दिलेली मान्यता आंतरराष्ट्रीय जैवसुरक्षा मानकांसाठी भारताची वचनबद्धता दर्शवते याबाबत उच्च दर्जा राखण्याची  भारताची  वचनबद्धता दर्शवते. तसेच मांस आणि अंडी यासह भारतीय पोल्ट्री आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात क्षमता वाढविण्यात यामुळे अधिक योगदान मिळेल. जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा अंडी उत्पादक (129.60 अब्ज) आणि कुक्कुट मांसाचा (4.47 दशलक्ष टन) पाचवा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून भारत ओळखला जातो. 


2022-23 मध्ये भारताकडून 64 देशांना पोल्ट्री आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात 


2022-23 आर्थिक वर्षात, भारताने 64 देशांना पोल्ट्री आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात केली जाते. ज्यामुळं 134 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा महसूल प्राप्त झाला आहे. या स्वयंघोषणेला मान्यता मिळाल्यानं जागतिक बाजारपेठेत भारतीय पोल्ट्रीसाठी नवीन संधी खुल्या होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळं देशाच्या आर्थिक वाढीला हातभार लागेल.


महत्त्वाच्या बातम्या:


14 वर्षांपूर्वी केलेल्या 'बर्ड फ्ल्यू' गाण्यामुळे पोल्ट्री व्यवसाय वाचला होता, यावेळी तसं होईल का? महेश टिळेकरांची फेसबुक पोस्ट व्हायरल