Investment Tips : अलीकडच्या काळात लोक विविध ठिकाणी गुंतवणूक (investment) करताना दिसत आहेत. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी दिवसेंदिवस गुंतवणुकीचं महत्व वाढलं आहे. लोकांकडे गुंतवणुकीसाठी एसआयपीसारखे (SIP) पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये चांगला परतावा लोकांना मिळत आहे. पण तरीही असे बरेच लोक आहेत ज्यांना अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळू शकेल. जर तुम्ही देखील अशा योजना शोधत असाल तर आम्ही तुम्हाला असे गुंतवणुकीचे पर्याय सांगत आहोत. ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे खूप काळ ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला चांगले व्याजही मिळेल. जाणून घेऊयात पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल सविस्तर माहिती.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. त्याला पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी FD चा पर्याय मिळतो. परंतू, तुम्हाला 5 वर्षांच्या FD वर सर्वाधिक नफा मिळतो. सध्या तुम्हाला या 5 वर्षांच्या FD वर 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. याशिवाय 5 वर्षांच्या एफडीमध्येही कर लाभ मिळतो. म्हणून याला टॅक्स सेव्हिंग एफडी असेही म्हणतात.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) हा सुरक्षित आणि हमी परतावा शोधणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. पोस्ट ऑफिसची ही योजना 5 वर्षात पूर्ण होते. सध्या त्यावर 7.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यामध्ये, वार्षिक आधारावर व्याज जमा केले जाते परंतु ते केवळ परिपक्वतेच्या वेळी दिले जाते. यामध्ये, आयकर कायदा 80C अंतर्गत कमाल 1.5 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत आयकर सूट उपलब्ध आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे SCSS (ज्येष्ठ नागरिक बचत योजना) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उत्कृष्ट योजना आहे. ज्यांना अधिक चांगला आणि हमी परतावा हवा आहे. यामध्ये किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. ही योजना देखील 5 वर्षांनी परिपक्व होते. सध्या त्यावर 8.2 टक्के दराने व्याज दिले जात आहे. जमा केलेल्या रकमेवर तिमाही आधारावर व्याज दिले जाते. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतही कर सवलती मिळतात. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. याशिवाय, 55 ते 60 वयोगटातील लोक ज्यांनी VRS घेतले आहे आणि निवृत्त संरक्षण कर्मचारी, ज्यांचे वय किमान 60 वर्षे आहे, ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या: