PM Kisan samman Nidhi Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan samman Nidhi Yojana) 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळमध्ये काल (28 फेब्रुवारीला) PM किसानच्या 16 वा हप्त्याचं वितरण करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून 16 वा हप्ता कधी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर काल 16 वा हप्ता जारी करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 वा हप्ता जारी केला. यामध्ये 21 हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानच्या 16 वा हप्त्याचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यापूर्वी, 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जारी करण्यात आला होता. तो देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच वितरीत करण्यात आला होता.
PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक?
तुम्ही लाभार्थी असाल तर, तुम्ही मेसेजद्वारे हप्त्याचे पैसे तपासू शकता. तुम्हाला सरकारकडून आणि बँकेकडूनही एक मेसेज येतो ज्यामध्ये तुम्हाला 2 हजार रुपयांचा हप्ता ट्रान्सफर झाल्याची माहिती दिली जाते.
जर काही कारणास्तव तुम्हाला हप्त्याचा मेसेज आला नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या खात्यात 16 व्या हप्त्याचे पैसे आले आहेत की नाही ते तपासू शकता.
तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन पासबुक एंट्री करून तुम्ही हप्त्याची रक्कम खात्यात ट्रान्सफर झाली आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.
अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
यानंतर, होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
त्यानंतर 'गेट स्टेटस' वर क्लिक करा
आता तुमच्या पेमेंटची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही
या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी, जमिनीच्या नोंदी आणि योजनेत नोंदणी करताना चुकीची माहिती प्रविष्ट केली होती. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचे पैसे आले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. योजनेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून ते योग्य मदत घेऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या:
PM किसानचा 16 वा हप्ता मिळणार नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावं? सविस्तर माहिती एका क्लिकवर