PM Kisan : अल्प भूधारक शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पिकांची वेळेवर पेरणी करता यावी यासाठी वर्षभरात शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे पीएम किसानची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये जारी केली जाते. दरम्यान, या योजनेअंतर्गत वडील आणि मुलगा दोघेही PM किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2023 रोजी पीएम किसानचा 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला होता. विशेष म्हणजे सरकारनं आतापर्यंत 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी केले आहेत. आतापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसानचे 15 हप्ते जारी केले आहेत. याचा फायदा देशातील करोडो शेतकऱ्यांना झाला आहे. आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पण दरम्यान, एकाच घरात वडील आणि मुलगा दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का, असा प्रश्न उपस्थित होतो. शेवटी, लाभार्थींबाबत पंतप्रधान किसान योजनेचा नियम काय आहे?


नियम काय सांगतो?


एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा दोघेही पीएम किसानचे लाभार्थी होऊ शकतात का? तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. नियमांनुसार, एका कुटुंबातील एका सदस्यालाच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे अलीकडेच केंद्र सरकारने पीएम किसानच्या नियमांबाबत नोटीसही जारी केली आहे. या नोटनुसार, देशातील अनेक लोक पात्र नसतानाही पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसानच्या नियमांनुसार, कुटुंबातील फक्त एक सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार नाही.


आतापर्यंत 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी पीएम किसानचा 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला होता. विशेष म्हणजे सरकारने आतापर्यंत 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी केले आहेत. याचा फायदा 11 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. जर शेतकऱ्यांना पीएम किसानशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करायचे असेल तर ते pmkisan-ict@gov.in वर ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात. त्याच वेळी, सरकारने पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक - 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 जारी केला आहे. याद्वारे देखील शेतकरी कॉल करून संपर्क साधू शकतात आणि पीएम किसानशी संबंधित माहिती मिळवू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या:


शेतकऱ्यांना कधी मिळणार PM किसानचा 16 वा हफ्ता? या' महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता