PM Kisan Samman Nidhi 16th Installment : केंद्र सरकारने (Central Govrnment) दिवाळीनंतर शेतकऱ्यांना (Farmers) गोड भेट देत दिली. दिवाळी संपताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) पंधरावा हफ्ता जमा झाला. 15 नोव्हेंबर रोली देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला. आता पंधराव्या हफ्त्यानंतर सोळाव्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. आता पीएम किसान योजनेचा सोळावा हफ्ता केव्हा मिळणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.
PM किसान योजनेचा 16 वा हफ्ता कधी मिळणार?
पीएम किसान सन्मान निधी, शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन मानली जाते. पीएन किसान लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे आर्थिक सहाय्य मिळेते. PM किसान योजनेच्या 16 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हफ्ता चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 15 वा हफ्ता नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आला होता, आता 16 वा हफ्ता फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान जारी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची योजना
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी शेतकर्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा करते. केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर 2023 ला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.