PM Jan Dhan Yojana: केंद्र सरकार (Central Govt)वेळोवेळी देशातील गरीब वर्गासाठी अनेक प्रकारच्या योजना आणते. प्रधानमंत्री जन धन योजना (PM Jan Dhan Yojana) ही अशीच एक योजना आहे. जी विशेषतः दुर्बल आर्थिक विभागातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. अलीकडेच, संसदेत पीएम जन धन खात्याबद्दल महत्त्वाची माहिती देताना सरकारने सांगितले की, या योजनेअंतर्गत देशभरात 51 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. परंतू, त्यापैकी 10 कोटींहून अधिक खाती निष्क्रिय आहेत. अशा परिस्थितीत निष्क्रिय खात्यांची संख्या एकूण खात्यांच्या 20 टक्के इतकी झाली आहे. एकूण निष्क्रिय बँक खात्यांपैकी जवळपास निम्मी खाती महिलांची असल्याची माहिती समोर आली आहे.


पीएम जनधन खात्यात 12000 कोटींहून अधिक रक्कम जमा


पीएम जन धन योजना सुरू करण्यामागील सरकारचा उद्देश देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सेवेशी जोडणे हा होता. या योजनेअंतर्गत तुम्ही शून्य शिल्लक खाते उघडू शकता. या योजनेने सरकारला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वितरित करण्यात मदत केली आहे. राज्यसभेत पंतप्रधान जन धन योजनेची आकडेवारी सादर करताना वित्त राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की, या योजनेअंतर्गत देशभरात एकूण 51.11 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी 10 कोटी अशी खाती आहेत, ज्यात गेल्या काही वर्षांत कोणताही व्यवहार झालेला नाही. अशा स्थितीत ही खाती निष्क्रिय झाली आहेत. निष्क्रिय खात्यांमध्ये महिला खातेदारांची संख्या 4.93 कोटी आहे. या निष्क्रिय खात्यांमध्ये एकूण 12,779 कोटी रुपये जमा आहेत, ज्यासाठी कोणताही दावाकर्ता नाही.


खाती निष्क्रिय का झाली?


वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी पीएम जनधन खाते निष्क्रिय करण्यामागे अनेक कारणे दिली आहेत. यामध्ये खातेदारांचा थेट संबंध नाही. अनेक वेळा खात्यात बराच काळ व्यवहार न झाल्यास ते निष्क्रिय होते. आरबीआयच्या नियमांनुसार, एखाद्या खात्यात दोन वर्षांहून अधिक काळ व्यवहार होत नसल्यास, असे खाते आपोआप निष्क्रिय होते. निष्क्रिय पीएम जनधन खात्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही वित्त राज्यमंत्री म्हणाले.


एवढी रक्कम पीएम जन धन योजनेंतर्गत जमा करण्यात आली 


प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या 51 कोटींहून अधिक खात्यांमध्ये एकूण 2,08,637.46 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे. जर तुमचे जन धन खाते देखील निष्क्रिय झाले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही केवायसी करून असे खाते पुन्हा सक्रिय करू शकता. जन धन खात्याअंतर्गत, खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड देखील मिळते. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन हे खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड, फोटो आणि केवायसी लागेल.


महत्त्वाच्या बातम्या:


PMJDY: काय आहे प्रधानमंत्री जन धन योजना? जाणून घ्या योजनेचे फायदे