Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा लोकप्रिय कार्यक्रम असून नुकत्याच पार पडलेल्या या भागात सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी हजेरी लावली. 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर या माय-लेकाच्या जोडीने वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य केलं.


सैफ अन् अमृताच्या घटस्फोवर शर्मिला यांनी सोडलं मौन


शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. शर्मिला टागोर म्हणाल्या,"सैफ आणि अमृता विभक्त होणं हे संपूर्ण कुटुंबासाठी त्रासदायक होतं. सैफ आणि अमृताने विभक्त होण्याचा निर्णय सगळ्यात आधी मला सांगितला होता. त्यावेळी मीदेखील त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं. सैफ आणि अमृतासाठी नक्कीच हा निर्णय सोपा नव्हता. त्यावेळी मी शांत राहायचं ठरवलं". 


करीना आपल्या सासूला 'या' नावाने मारते हाक


'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर सैफ आणि शर्मिला यांच्या उपस्थित करीना, सारा आणि सोहाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. सारा अली खान आपल्या लाडक्या आजीला प्रेमाने 'बडी अम्मा' अशी हाक मारते. तर करीना कपूर सासूबाई शर्मिला यांना 'अम्मा' म्हणूक हाक मारते. तर सैफ अली खानला करीना 'सैफू' म्हणून बोलावते. 






'आराधना'साठी शर्मिला टागोर निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती


शर्मिला टागोर यांचा 1969 मध्ये आलेला 'आराधना' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात शर्मिला यांच्यासोबत राजेश खन्ना स्क्रीन शेअर करताना दिसून आले होते. 'आराधना' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. पण 'आराधना'साठी शर्मिला टागोर निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. 


शर्मिला टागोर म्हणाल्या,"आराधना' या सिनेमात काम करण्याची माझी इच्छा होती. निर्मात्यांना मी आवडत होते. पण या सिनेमासाठी मी योग्य नाही आणि ती भूमिका मी करू शकत नाही, असं त्यांना वाटत होतं. शमी यांना या सिनेमासाठी विचारणा झाली होती. पण काही कारणाने त्यांना हा सिनेमा करता आला नाही आणि माझ्या वाट्याला आला". 


संबंधित बातम्या


Koffee With Karan 8: कॉफी विथ करणमध्ये माय-लेकाची जोडी; करिनाबद्दल सैफला करणचा तो अजब प्रश्न अन् झाला शॉक