NSE : ईडीने (ED) को-लोकेशन (NSE Co- Location Case) प्रकरणात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) चे माजी अध्यक्ष रवी नारायण यांना अटक केली आहे. ईडीने या वर्षी 14 जुलैला नॅशनल स्टाॅक एक्सचेंजच्या माजी  अध्यक्ष चित्रा रामकृष्ण, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) आणि रवि नारायण यांच्या विरोधात  प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्टअंतर्गत (PMLA) गुन्हा दाखल केला होता. 


 






 


रवी नारायण एप्रिल 1994 ते मार्च 2013 पर्यंत एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी


या अगोदर एनएसई घोटाळाप्रकरणी (NSE Scam) 2009 आणि 2017 या कालावधीत तिघांची सीबीआय चौकशी करण्यात आली होती.  गोपनीय माहिती अज्ञात व्यक्तीसोबत शेअर केल्याप्रकरणी  सीबीआय तपास करत आहेत.  रवी नारायण हे एप्रिल 1994 ते मार्च 2013 पर्यंत नॅशनल स्टाॅक एक्सचेंजचे एमडी आणि सीईओ होते. एप्रिल 2013 पासून एनएसईच्या संचालक मंडळावर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती आणि जून 2017 पर्यंत ते यापदावर होते.


कोण आहेत चित्रा रामकृष्ण?


चित्रा रामकृष्ण या एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने (SEBI) ठेवला होता. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी (Share Market) संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता. चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. चित्रा रामकृष्ण यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत गोपनीय माहिती ब्रोकर्सपर्यंत पोहोचवली असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांना सीबीआयनं (CBI) 6 मार्च रोजी अटक केली होती.


संबंधित बातम्या :


NSE Scam And Sanjay Pandey : एनएसई घोटाळा प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे का अडकले? जाणून घ्या


Chitra Ramakrishna : चित्रा रामकृष्ण यांना सात दिवसांची सीबीआय कस्टडी