Petrol Diesel Price Today 14th February 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) चढ-उतार सुरू आहेत. कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर होत असतो. आज सकाळी 14 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price Today) जाहीर केले आहेत. मात्र, आजही नागरिकांना इंधन दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. आजही पेट्रोल (Petrol Rate), डिझेलचे दर (Diesel Rate) स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 22 मे 2022 पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, आज 14 फेब्रुवारी रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol Diesel Price Today : देशांतील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही.
शहर |
पेट्रोल |
डिझेल |
मुंबई |
106.31 |
94.27 |
दिल्ली |
96.72 |
89.62 |
चेन्नई |
102.63 |
94.24 |
कोलकाता |
106.03 |
92.76 |
पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Inflation : 'महंगाई डायन...'; जानेवारी महिन्यात महागाईचा झटका, किरकोळ महागाईचा दर वाढला