Petrol Diesel Price on 06 January 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात वर्षाच्या सुरुवातीपासूनच कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. भारतीय तेल कंपन्याने आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) जारी केले आहेत. आज इंधन दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही. मागील काही दिवस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली होती, मात्र तेव्हाही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळाला नव्हता. आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलची (WTI Crude Oil Price) किंमत 0.54 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 74.07 डॉलरवर पोहोचली आहे. दुसरीकडे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये 1.09 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 78.69 वर पोहोचली आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतींचा आज भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर काय परिणाम झालाय, सविस्तर जाणून घ्या.

Petrol Diesel Price Today : देशांतील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही.

शहर

पेट्रोल

डिझेल

मुंबई

106.31 

94.27 

पुणे

106.99

93.47

नाशिक

106.89

93.38

कोल्हापूर

108.30

93.42

नागपूर

106.70

93.23

दिल्ली

96.72 

89.62

बंगळुरु

101.94

87.89

चेन्नई

102.63

94.24

कोलकाता    

106.03    

92.76

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Why Petrol Diesel Price Not Decrease: कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; तरीदेखील पेट्रोल, डिझेलच्या दरात 'या' कारणाने होत नाही कपात