Petrol Diesel Price: काही राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे, तर काही राज्यातील नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) घसरण झाली आहे. तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर आसाम, बिहार, गुजरात, झारखंड आणि केरळसह काही राज्यांमध्ये इंधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दर जैसे थे स्थिर आहेत.


मिळालेल्या माहितीनमुसार कच्च्या तेलाच्या किंमतीत एक टक्क्याहून अधिक घसरण झाली. त्यामुळं ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 81.90 डॉलरवर बंद झाले. मात्र, या घसरणीचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर फारसा परिणाम होत नाही. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती. आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 0.80 पैशांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर आसाम, बिहार, गुजरात, झारखंड आणि केरळसह काही राज्यांमध्ये इंधनाचे दर कमी झाले आहेत. 


मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?


दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.86 रुपये आणि डिझेल 94.46 रुपये प्रति लिटर
नोएडामध्ये पेट्रोल 96.59 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर 
गाझियाबादमध्ये पेट्रोल दर 96.58 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.66 रुपये प्रति लिटर 
पाटणामध्ये पेट्रोल 107.54 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर 


पेट्रोल आणि डिझेलच्या दराबद्दल कशी मिळवाल माहिती?


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर आरएसपी आणि त्यांचा शहर कोड टाइप करून माहिती मिळवू शकतात. बीपी सीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी आणि त्यांचा शहर कोड लिहून एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची घसरण, कोणत्या शहरात किती दर?