Petrol-Diesel Price Today 8th February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आज 8 फेब्रुवारी 2022 रोजी पेट्रोल  (Petrol)-डिझेल (Diesel) च्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अशातच देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमती 4 नोव्हेंबरपासून स्थिर आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. अशातच दुसरीकडे निवडणुका पार पडल्यानंतर मात्र देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरांत मोठी वाढ पाहायला मिळू शकते. 

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल (Crude Oil) च्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड 93 डॉलर प्रति बॅरल पार पोहोचलं आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. 

महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती : 

प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 रुपये प्रति लिटर  94.14 रुपये प्रति लिटर
ठाणे 110.12 रुपये प्रति लिटर  94.28  रुपये प्रति लिटर
पुणे 109.72 रुपये प्रति लिटर  92.50 रुपये प्रति लिटर
नाशिक 109.79 रुपये प्रति लिटर 92.57 रुपये प्रति लिटर
नागपूर 110.10 रुपये प्रति लिटर 92.90 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर 109.66 रुपये प्रति लिटर  92.48 रुपये प्रति लिटर
अहमदनगर 110.12  रुपये प्रति लिटर  92.90 रुपये प्रति लिटर
अमरावती 111.14 रुपये प्रति लिटर  93.90 रुपये प्रति लिटर

देशातील महत्त्वाच्या शहरांतील किमती काय? 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.

केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशातील महानगरांतील आजचे दर :
देशातील प्रमुख शहरं  पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई 109.98  94.14
दिल्ली 95.41  86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79
पाटणा 105.92 91.09

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा