Petrol Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता देशातील पेट्रोल-डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले जातात. त्यानुसार आज देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price)  सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून जाहीर करण्यात आले आहेत, मात्र आजच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होतात, याची सर्वसामान्य जनता प्रतीक्षा करत आहे. देशातील चार प्रमुख महानगर दिल्ली, मुंबई, कोलकातासह महाराष्ट्रातील शहरात काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर? जाणून घ्या सविस्तर


कच्च्या तेलाचे आजचे दर 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांतही गेल्या कित्येत दिवसांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कच्च्या तेलाचे आजचे दर बघितले तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 88.51 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $ 81.46 वर आहे.



देशातील महानगरातील दर पेट्रोल आणि डिझेलचे दर 
दिल्ली - पेट्रोल 96.72 प्रति लिटर, डिझेल 89.62 प्रति लिटर
चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये, डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर



राज्यात कुठे पेट्रोल महागले? कुठे स्वस्त?


महाराष्ट्रातील परभणीत सध्याचा पेट्रोलचा दर  109.47 रुपये आणि डिझेलचा दर 95.86  रुपये प्रति लिटर आहे. तर, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.70 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 93.23 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 106.99  रुपये आणि डिझेलचा दर 93.47  रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.90 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.42 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 107.62 रुपये आणि डिझेलचा दर 94.08 प्रति लिटर इतका आहे


इंधन दर कसे पाहाल? 


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price) मोबाइलवरही इंधन दर पाहता येतील. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता वर्षाकाठी केवळ 15 तर महिन्याला मिळणार दोनच सिलेंडर