Petrol-Diesel Price Today 3rd February 2022 : भारतीय तेल कंपन्यांच्या वतीनं पेट्रोल-डिझेलचे दर जारी करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सध्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक पातळीवर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असूनही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार आहेत. अशातच देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती अद्यापही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहेत. दरम्यान, आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अशातच उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवरील कर आणखी कमी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
अर्थसंकल्पात पेट्रोलियम पदार्थांवरील अनुदानात घट; पेट्रोल-डिझेल कडाडणार?
भारतीय तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. मंगळवारी म्हणजेच, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं अन्न, खतं आणि पेट्रोलियम उत्पादनांवरील अनुदानावर सरकारचा अर्थसंकल्प 39 टक्क्यांनी कमी होऊन 4,33,108 कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...
राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :
प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 रुपये प्रति लिटर | 94.14 रुपये प्रति लिटर |
ठाणे | 110.12 रुपये प्रति लिटर | 94.28 रुपये प्रति लिटर |
पुणे | 109.72 रुपये प्रति लिटर | 92.50 रुपये प्रति लिटर |
नाशिक | 109.79 रुपये प्रति लिटर | 92.57 रुपये प्रति लिटर |
नागपूर | 110.10 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
कोल्हापूर | 109.66 रुपये प्रति लिटर | 92.48 रुपये प्रति लिटर |
अहमदनगर | 110.12 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
अमरावती | 111.14 रुपये प्रति लिटर | 93.90 रुपये प्रति लिटर |
देशातील महत्त्वाच्या शहरांतील किमती काय?