Petrol Diesel Price Today:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण दिसून (Crude Oil Price) आली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलच्या (Brent Crude Oil) दर प्रति बॅरल 86 डॉलरच्या आसपास आहे. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 78 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे देशातील ग्राहकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी आजचे इंधन दर जाहीर केले आहेत. देशात आजही इंधन दर स्थिर आहेत. 


केंद्र सरकारने  21 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात जुलै महिन्यात इंधनावरील कर कमी करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील इंधन दरात कोणताही बदल झाला नाही. 


काही महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्य्या तेलाचे दर घसरले आहेत. कच्च्या तेलाचे दर एवढ्या प्रमाणात घसरल्याने इंधन दरात कपात करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. मात्र, केंद्र सरकार अथवा इंधन कंपन्यांनी तसे कोणतेही संकेत दिले नाहीत. 


राज्यातील प्रमुख शहरात दर काय?


महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. परभणीत राज्यातील सर्वाधिक इंधन दर आहे. पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. 


देशातील प्रमुख महानगरात इंधन दर काय?


दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर असा दर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर इतका आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईत मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे.


मोबाईलवर पाहता येतील इंधन दर 


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).