Petrol Diesel Rate Today : देशात आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024 ) तयारी सुरु झाल्याचं दिसून येत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर (Ayodhya Ram Mandir) देशात भाजपने (BJP0 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Muksh Ambani) 3 वर्षांनंतर एक मोठं काम करणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला स्वस्त पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel Price) मिळू शकते.


पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? (Petrol Diesel Price Today)


याआधी पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितलं होतं की, भारत त्या सर्व देशांमधून कच्चे तेल आयात करेल ज्यावर बंदी नाही. डिसेंबर महिन्यात 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतरच पेट्रोलियम मंत्रालयाने ही घोषणा केली होती. त्यामुळे आता भारतात कच्च्या तेलाच्या व्हेनेझुएलाहून आयात करण्याची शक्यता आहे.  भारतात 3 वर्षांनंतरव्हेनेझुएला येथून कच्च तेल आयात होण्याची शक्यता वाढली आहे. व्हेनेझुएलातून कच्चं तेल आयात करण्यावर लादलेले आर्थिक निर्बंध 2019 मध्ये उठवण्यात आले आहेत. कमोडिटी मार्केट ॲनालिटिक्स फर्म कॅप्लरच्या मते, व्हेनेझुएलामधून तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये कच्च्या तेलाची भारतात आयात करण्यात आली होती.


रशियापेक्षा स्वस्त कच्च्या तेलाचा पर्याय


आतापर्यंत भारत रशियाकडून कच्च्या तेलाची मोठ्या सवलतीत आयात करत होता. आता ही सवलत प्रति बॅरल फक्त 2 डॉलरवर आली आहे. पण, भारताकडे रशियापेक्षा स्वस्त कच्च्या तेलाचा पर्याय आहे. व्हेनेझुएलाकडून भारताला प्रति बॅरल 8 ते 10 डॉलरच्या सवलतीत कच्चे तेल मिळण्याची अपेक्षा आहे. व्हेनेझुएला कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेकचा सदस्य आहे.


व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वाधिक तेलसाठा


भारत 80 टक्के कच्चं तेल आयात करतो. सध्या जगातील सर्वात मोठा तेलसाठा व्हेनेझुएला येथे आहे. त्यामुळे व्हेनेझुएलातून स्वस्त तेल उपलब्ध झाल्यास बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरतील आणि भारतीय रिफायनरींना त्याचा फायदा होईल. परिणामी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.


मुकेश अंबानींचा थेट करार


देशात आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त दरात इंधन मिळण्याची आशा आहे. मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज कच्च्या तेलाच्या आयातीसंदर्भात थेट व्हेनेझुएलाशी व्यवहार करेल, हे डिसेंबर 2023 मध्ये स्पष्ट झालं होतं. त्यानंतर रिलायन्स कंपनीने कच्च्या तेलाचे 3 टँकर बुक केल्याची माहिती समोर आली असून या टँकरची डिलिव्हरी जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. 


निवडणुकीआधी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?


यापूर्वी देखील, रिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त, नायरा एनर्जी लिमिटेड नियमितपणे व्हेनेझुएलामधून कच्चे तेल आयात करत होती. मात्र, यावेळी सरकारी तेल कंपन्याही व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.