Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला नऊ ग्रहांच्या राजकुमाराचा दर्जा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यापार आणि वाणीचा दाता आहे. बुध हा लोकांना चांगलं आरोग्य आणि सुख सुविधा देणारा ग्रह आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत बुधाचं स्थान बलवान असतं, अशा लोकांना जीवनाच्या प्रत्येक वाटेवर यश मिळतं. नोकरी, व्यवसाय आणि राजकारणातही मोठं यश मिळतं. जर बुध आणि गुरू ग्रह एखाद्याच्या राशीत एकत्र असतील, तर त्यांचा व्यवसाय खूप प्रगती करतो.


जेव्हा जेव्हा बुध (Mercury) आपली राशी बदलतो किंवा त्याच्या हालचाली बदलतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या करिअरवर, आर्थिक स्थितीवर होतो. बुध 1 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजून 8 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. या मार्गक्रमणाचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा परिणाम होईल. पण 3 राशी अशा आहेत, ज्यांना बुध मार्गक्रमणाचा चांगला लाभ मिळेल, 1 फेब्रुवारीपासून या राशींचं भाग्य उजळेल. या 3 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मकर राशीतील बुधाचं मार्गक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. या लोकांना नवीन नोकरीसाठी ऑफर लेटर मिळू शकतं. तुम्हाला परदेशात नोकरीची संधीही मिळू शकते. तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्यं वापरून तुम्ही इतरांना प्रभावित करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकाल आणि उत्तम कामगिरी बजावाल. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं मधुर राहील.


सिंह रास (Leo)


बुध ग्रहाच्या मार्गक्रमणानंतर सिंह राशीच्या लोकांना ते करत असलेल्या कोणत्याही कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या मेहनतीची आणि उत्तम कामाची प्रशंसा करतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नतीसह नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकता. या संक्रमण कालावधीत तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. 


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या व्यावसायिकांसाठी 1 फेब्रुवारीनंतर चांगला काळ सुरू होणार आहे. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना नशिबाची साथ मिळेल. येणाऱ्या काळात नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल आणि कामात तुम्ही प्रगती कराल. या काळात तुमचे डोळे दुखू शकतात किंवा डोळ्यांशी संबंधित काही प्रकारचे संसर्ग तुम्हाला होऊ शकतात, त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि बाहेरचं खाणं टाळा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Mars Transit 2024 : फेब्रुवारीत मेषसह 'या' 2 राशींना मिळणार लाभच लाभ; जेव्हा मंगळ बदलणार आपली चाल