Petrol Diesel Price Today 3rd November 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू असताना दुसरीकडे आज देशातील इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर (Petrol Diesel Price Today) केले आहेत. देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून त्यात कोणताही बदल झाला नाही. पेट्रोल, डिझेलच्या (Petrol Diesel) दरात कपात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळत असला तरी महागाई (Inflation) अजूनही चिंतेचा विषय आहे.
कच्च्या तेलाचे दर काय?
गुरुवारी सकाळी WTI क्रूड ऑईलचा दर 89 डॉलर प्रति बॅरल इतका होता. तर, ब्रेंट क्रूड ऑईलचा दर हा 95.36 डॉलर प्रति बॅरल इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली. त्याच्या परिणामी कच्च्या तेलाचे दर पुन्हा वधारले आहेत. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाचे दर घसरले होते. या घसरणीला लगाम लावण्यासाठी ओपेकने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला.
पाच महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
देशात पेट्रोल-डिझेलचे दर मागील पाच महिन्यांपासून स्थिर आहेत. मे महिन्यात केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने करात कपात केल्याने पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले होते.
चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा दर
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोलकात्यात 106.03 रुपये प्रति लिटर, मुंबईत 106.31 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये प्रति लिटर इतका आहे. डिझेलच्या दरातही कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे दिल्लीत 89.62 रुपये प्रति लिटर, मुंबईत 97.28 रुपये प्रति लिटर, चेन्नईत 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये 92.76 रुपये प्रति लिटर इतका दर आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर