मुंबई:  युवासेना (Yuva Sena) प्रमुख आदित्य ठाकरेंनी युवासेना मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांनी राज्यात अनेक शहरात दौरे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर अनेक तरुण शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे युवासेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मैदानात उतरले.  'शिवसेनेचा युवराज' या नावाने आदित्य ठाकरे यांच्यावरील गाणे लाँच करण्यात आले आहे. 


शिवसेनेचा युवराज' असे शीर्षक असलेल्या गीताचे आज लॉन्चिंग करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते अंधेरी पश्चिमेकडील एका विशेष कार्यक्रमांमध्ये या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले.माजी केंद्रीय मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी हे गीत तयार केले आहे.


शिवसेनेत झालेल्या बंडाळी नंतर स्वतः आदित्य ठाकरे यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली असून ते बंडखोर आमदाराच्या मतदार संघात जाऊन कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचे काम करत आहेत. या गाण्यांमधून तरुणांना प्रेरणा मिळेल आणि लाखो तरुण शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. हेच या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीअगोदर एक दिवस हे गाणे लॉन्च करण्यात आले आहे.  मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आता हे गाणे प्रेरणादायी ठरू शकते. आदित्य ठाकरे हे एक लढवय्या योद्धा आहेत त्यामुळे हे गाणे युवकांना प्रेरित करेल.


एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे  शिवसेनेत  उभी फूट पडली. अनेक मातब्बर नेत्यांनी शिवसेनची साथ सोडली. तेव्हापासून ठाकरे पितापुत्रांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी बैठकींचा आणि दौऱ्यांचा सपाटा लावलाय. आदित्य ठाकरे  रस्त्यावर उतरून शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत . तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील जनतेला संबाधित करत आहेत.


शिवसेनेचा युवराज' आदित्य ठाकरे यांच्यावरील गाणं



 ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात अडीच लाख सदस्यत्वाचे अर्ज


 शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात आज अडीच लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून एकूण दहा लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाला सादर करण्यात आले आहेत. यामध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी बुथप्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंतचे अर्ज आहेत. ठाकरे गटाने याआधी साडेआठ लाख आणि आज अडीच लाख सदस्यत्व अर्ज दाखल केले आहेत. सोबत एकूण 2 लाख 62 हजार शपथपत्र देण्याचा इरादा आहे. त्यापैकी आतापर्यंत 70 हजार शपथ पत्र दाखल करण्यात आली आहेत. 


संबंधित बातम्या :


वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस महाराष्ट्राबाहेर जाण्याचं नेमकं वास्तव काय? महाराष्ट्राला पडलेल्या 11 प्रश्नांची उत्तरं