Petrol and Diesel Price: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत दररोज बदल होत असतात. कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे देशातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel) अपडेट केल्या जातात. आजही (15 मार्च) सर्व राज्यांमध्ये तेलाच्या किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशातील सर्व महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 

कच्च्या तेलाची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात आज (बुधवार) 15 मार्च रोजी ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 78.29 डॉलर आहे. तसेच, WTI क्रूड प्रति बॅरल 72.19 डॉलरवर आहे. कालच्या तुलनेत या किमतींमध्ये वाढ नोंदवण्यात आली असली तरी मागील दिवसांच्या तुलनेत या किमतींमध्ये घट दिसून येत आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).