Petrol and Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा कच्च्या तेलातील (Crude Oil) चढ-उताराचा फायदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरही दिसून येतो. मात्र 22 मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol and Diesel) कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांकडून आज (15 फेब्रुवारी 2023) देशातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबईसह विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर काय आहेत, ते येथे जाणून घ्या.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोणताही बदल नाही

22 मेपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही स्थिर आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील महानगरांतही पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. 

कच्च्या तेलाच्या दरांत घट 

आजच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. WTI क्रूड ऑइल प्राईस (WTI Crude Oil Price) आणि ब्रेंट क्रूड ऑइल (Brent Crude Oil) हे दोन्ही आज लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. 

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).