Petrol and Diesel Price Today: आजपासून नवा महिना सुरू झाला आहे. आज 1 फेब्रुवारी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण  (Nirmala Sitharaman) आज 2023-24 चा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. केंद्र सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. 2024 हे निवडणुकीचे वर्ष आहे. आजच्या अर्थसंकल्पातून, जनतेला आशा आहे की, सरकार अशी काही पावले उचलेल ज्यामुळे जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी 2023 चा अर्थसंकल्प  (Budget 2023)  सादर करण्यापूर्वी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत काही बदल झाला आहे का? हे जाणून घेऊयात... 

भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी देशातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. या चार शहरांतील दर जुन्याच दरांवरच स्थिर आहेत. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बऱ्याच काळापासून कोणताही मोठा बदल झालेला नाही. शेवटचा मोठा बदल 21 मे 2022 रोजी झाला होता, त्यावेळी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन शुल्क 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरने कमी केले होते.

Petrol Diesel Price Today : देशांतील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही.

शहर

पेट्रोल

डिझेल

मुंबई

106.31 

94.27 

पुणे

106.99

93.47

नाशिक

106.89

93.38

कोल्हापूर

108.30

93.42

नागपूर

106.70

93.23

दिल्ली

96.72 

89.62

बंगळुरु

101.94

87.89

चेन्नई

102.63

94.24

कोलकाता    

106.03    

92.76

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).