Petrol Diesel Rate on 1 August 2023: देशातील सर्व सरकारी तेल कंपन्या राज्य आणि शहरांनुसार दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर करतात. आज 1 ऑगस्ट 2023, आजपासून नवा महिना सुरू झाल्यानं, या नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. देशातील चार महानगरांबद्दल बोलायचं झालं तर आजही या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या किमतींत किरकोळ बदल करण्यात आला आहे. 


कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत आज चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) आज 0.67 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 85.56 डॉलरवर व्यापार करत आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) घसरण दिसून येत आहे आणि ते 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल 81.64 डॉलरवर व्यापार करत आहे.


देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेल स्थिर 



  • दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर (Delhi Petrol Diesel Price)

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर (Mumbai Petrol Diesel Price)

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 


दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).