Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण (Petrol and diesel price dropped) झाल्यामुळं सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. अशातच लक्षद्वीपमध्ये (Lakshadweep) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 15.3 रुपयांची घसरण झाली आहे. नवीन दर काल रात्रीपासूनच लागू झाले आहेत. 


नवे दर काय?


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाल्यामुळं लक्षद्वीपच्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण तब्बल  15.3 रुपयांची घसरण झाली आहे. लक्षद्वीपच्या एंड्रोट आणि कालपेनी बेटांवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किमती 15.3 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर मिनिकॉय बेटांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5.2 रुपयांची घरसण झालीय. तर दुसरीकडे राजस्थान रकारने देखील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट 2 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळं तिथेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, लक्षद्वीपच्या सर्व बेटांवर पेट्रोल डिझेलची किंमत आता 100.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेलसाठी 95.71 रुपये आहे.


पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची फेसबूक पोस्ट चर्चेत


दरम्यान, लक्षद्वीपमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाल्यानंतर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे तर, विरोधकांवर टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या जनतेला आपलं कुटुंब मानलं आहे. हीच मोदी सरकारची हमी आहे. ज्याचा देशातील सर्व जनतेला लाभ मिळत असल्याचे मंत्री पुरी म्हणाले. पुर्वीचे नेते कुटुंबीयांसोबत सुट्टी साजरी करायचे, निघून जायचे असे म्हणत मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विरोधकांवर टीका केलीय.


निवडणुकीपुर्वी जनतेला दिलासा


देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काल निवडणूक आयुक्तांनी या निवडणुकांची घोषणा केलीय. कालपासून आचारसंहिता लागू झालीय. मात्र, त्यापूर्वीच केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. निवडणुकीपुर्वी सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारकडून गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी दोन रुपयांची कपात करण्यात आली होती. नवीन दर म्हणजे 15 मार्चपासून लागू झाले आहेत. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. 


महत्वाच्या बातम्या:


पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार का? पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं मोठं वक्तव्य