SIP Investment:  अनेकजण गुंतवणुकीचा सल्ला देताना  SIP (Systematic Investment Plan) करण्याचा सल्ला देतात. दरमहा ठरवलेली रक्कम एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवल्यास त्याचा चांगला काही वर्षांनी चांगला परतावा मिळू शकतो, असे गुंतवणूक तज्ज्ञ म्हणतात. एसआयपीच्या माध्यमातून काही हजारांची गुंतवणूक ही तुम्हाला करोडपतीदेखील करू शकते. ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी फंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HDFC फ्लेक्सी कॅप फंडने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला  आहे. लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंड ग्राहकांना चांगला परतावा दिला. 1 जानेवारी 1995 रोजी सुरू झालेल्या या फंडने यंदा 28 वर्ष पूर्ण केले. या फंडने 28 वर्षात 10 हजारांच्या गुंतवणुकीने 21 टक्के CAGR ने 12 कोटी केले. 


10 हजाराच्या गुंतवणुकीने किती झाले असते?


10,000 रुपयांच्या मासिक SIP ने गेल्या वर्षभरात तुमची एकूण 1.20 लाख रुपयांची गुंतवणूक ही मागील वर्षी 1.39 लाख झाली असती. या दरम्यान फंडने 30.29 टक्के दराने वार्षिक परतावा गुंतवणूकदारांना दिला. तीन वर्षात 10 हजार रुपयांची गुंतवणूक 3.60 लाख रुपये इतकी झाली असती. या तीन वर्षाच्या काळात 31.03 टक्के दराच्या परताव्याने ही गुंतवणूक 5.61 लाख रुपये इतकी झाली असती. 


या म्युच्युअल फंडात मागील पाच वर्षांमध्ये 20.82 टक्के दराने परतावा मिळाल्यामुळे 10000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक 6 लाख रुपये झाली असती. त्याचे तुम्हाला परताव्यासह 10.07 लाख रुपये मिळाले असते. या फंडाने मागील 10 वर्षात 16.11 टक्के दराने परतावा दिला आहे. तुमची SIP गुंतवणूक 12 लाख रुपये झाली असती आणि त्यावर 16.11 टक्के दराने 27.92 लाख रुपये मिळाले असते. 


मागील 15 वर्षात दरमहा 10 हजार रुपयांची गुंतवणूक 18 लाख रुपये झाली असती.  त्यावर 15.32 टक्के दराने तुम्हाला 63.38 लाख रुपये मिळाले असते. या म्युच्युअल फंडच्या सुरुवातीपासून तुम्ही 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर, 21 टक्क्यांचा  परतावा मिळाला असता. या 28 वर्षाच्या कालावधीतील गुंतवणूक 33.50 लाख रुपये झाली असती. त्यावर 21 टक्क्यांचा परतावा गृहीत धरता ही रक्कम 12.94 कोटी इतकी झाली असती. 


10 हजाराचे एक कोटी


एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडात सुरुवातीपासून 10 हजार रुपयांची एक रक्कमी  गुंतवणूक केली  असती तर,. त्याचे मूल्य आताच्या काळात 1.18 कोटी रुपये झाली  असती. 


एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडाची गुंतवणूक कुठे?


एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडाकडून ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, HDFC बँक, NTPC, भारती एअरटेल, HCL टेक्नॉलॉजीज,  लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा आदी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. 


बँकिंग, आयटी-सॉफ्टवेअर, वित्त, ऊर्जा, बांधकाम, दूरसंचार सेवा, ऑटोमोबाईल्स, एरोस्पेस आणि संरक्षण, पेट्रोलियम उत्पादने आणि विमा सेक्टरमध्ये या फंडाची गुंतवणूक आहे. 


(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी म्युच्युअल फंडमध्ये  गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा, आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्यावा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे.)