Share Market Opening Bell : आज भारतीय शेअर बाजारात (Stock Market) दमदार सुरुवात पाहायला मिळाली आहे. मंगळवारी पहिल्या सत्रात बाजार सुरु होताच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. आज शेअर बाजारात आयटी सेक्टर (IT Sector) आणि बँक सेक्टरचे (Bank Sector) शेअर्स वधारल्याचं दिसून येत आहे. या शेअर्सची चांगली घोडदौड सुरु आहे. गुरुवारी अमेरिकन बाजारातील तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत असून स्टॉक्समध्ये (Stocks) तेजी पाहायला मिळत आहे. 


शेअर बाजारात तेजीत सुरुवात


पहिल्या सत्रात बाजार सुरु होताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीची (Nifty) हिरव्या रंगासह सुरुवात झाली. बँक निफ्टी आणि आयटी इंडेक्स सध्या हिरव्या रंगासह तेजीत व्यवहार करत आहेत. निफ्टी एक टक्क्यातहून अधिक वाढीसह तेजीत व्यवहार करत आहेत. सध्या 1400 हून अधिक शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत, तर सुमारे 200 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. 


सेन्सेक्स 72000 तर, निफ्टी 21775 वर (Stock Market Sensex & Nifty)


आजच्या व्यवहारात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 58.63 अंकांनी वाढून 72,000 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला आहे. याशिवाय एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 38.15 अंकांच्या किंवा 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 21,775 च्या पातळीवर उघडला आहे.


प्री-ओपनिंगमधूनच चांगले संकेत (Share Market Pre Opening)


आज शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगचे चांगले संकेत मिळाले. GIFT निफ्टी 90.80 अंक म्हणजेच 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 21966 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. यामुळे देशांतर्गत शेअर बाजार उघडताना निफ्टी 50 ने 22,000 ची पातळी ओलांडण्याची चांगली चिन्हे होती.


'या' शेअर्समध्ये वाढ ( Top Gainers in Stock Market)


बीपीसीएल (BPCL), ओएनजीसी (ONGC), हिंदाल्को इंडस्ट्रीज (Hindalco Industries), जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel), इन्फोसिस (Infosys) या निफ्टी (Nifty) शेअर्सचा दमदार वाढीसह तेजीत व्यवहार सुरु आहे. आयटी (IT), धातू (Metal) तसेच तेल (Oil) आणि गॅस (Gas) कंपन्यांचे शेअर्सही एक टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.


'या' शेअर्समध्ये घसरण (Top Losers in Stock Market)


दरम्यान, बजाज फायनान्स (Bajaj Finance), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), एनटीपीसी (NTPC) आणि टायटन (Titan) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.


(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Share Market : 5 वर्षात 2500 टक्के परतावा, 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल