HDFC Market Cap : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी चढ-उताराचे झाल्याचं पाहायला मिळालं. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या (Stock Market) दिवशी गुरुवारी सेन्सेक्स (Sensex) 71000 च्या खाली आणि निफ्टी 21,352 अंकांवर बंद झाला. गेल्या आठवड्यातील तीन दिवसांच्या व्यवहारात टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1.16 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. एचडीएफसी (HDFC) बँकेचे सर्वाधिक नुकसान झालं.


HDFC ला 32661 कोटी रुपयांचा फटका


गेल्या आठवड्यात एचडीएफसी (HDFC) बँकेचे मार्केट कॅप 32,661.45 कोटी रुपयांनी घटून 10,90,001.31 कोटी रुपये झाले. एलआयसी (LIC) चे मार्केट कॅप 20,682.74 कोटी रुपयांनी घसरले आणि 5,71,337.04 कोटी रुपये झाले. टीसीएसच्या मार्केट कॅपमध्ये (TCS) 19,173.43 कोटी रुपयांची घसरण झाली. त्यामुळे TCS मार्केट कॅप 13,93,439.94 कोटी रुपयांवर पोहोचली.


टॉप 7 कंपन्यांना 1 लाख कोटींहून अधिक नुकसान


या तीन दिवसांत बीएसईच्या (BSE) 30 शेअर्सच्या सेन्सेक्सला 982.56 अंकांची घसरण झाली. टॉप 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services Ltd), एचडीएफसी बँक (HDFC Bank), एलआयसी (LIC), हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL), आयटीसी (ITC) आणि भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), इन्फोसिस (Infosys) आणि भारती एअरटेलच्या (Bharti Airtel) स्थानामध्ये वाढ झाली.


भारतीय स्टेट बँक (SBI) चे भांडवल 16,599.77 कोटी रुपयांच्या तोट्यासह 5,46,989.47 कोटी रुपये होते. आयटीसीचे (ITC) बाजार भांडवल 15,908.1 कोटी रुपयांनी घसरून 5,68,262.28 कोटी रुपयांवर आले. त्याशिवाय हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 9,210.4 कोटी रुपयांच्या तोट्यासह 5,70,974.17 कोटी रुपयांवर घसरले. 


'या' कंपन्यांचा फायदा


आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) बाजार भांडवल 1,137.37 कोटी रुपयांनी वाढून 7,08,511.16 कोटी रुपये झाले. टॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर टीसीएस (TCS), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), इन्फोसिस (Infosys), भारती एअरटेल (Bharti Airtel), एलआयसी (LIC), हिंदुस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever Limited), आयटीसी (ITC) आणि भारतीय स्टेट बँक (State Bank of India) या कंपन्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 18,33,737.60 कोटी रुपये झाले. दुसरीकडे, भारती एअरटेलचे मार्केट कॅप 6,52,407.83 कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये 9,151.75 कोटी रुपयांची वाढ झाली असून त्याचे बाजारमूल्य 6,93,457.65 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Waaree Renewable : एक लाख रुपयांचे झाले 5 कोटी रुपये, गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवणारा शेअर