PPF Withdrawal Rules: केंद्र सरकारकडून पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (Public Provident Fund) ही गुंतवणूक योजना चालवण्यात येते. या योजनेत सामान्यांना कमी रक्कमेत गुंतवणूक करता येते. या योजनेचा मोठा फायदा असंघटीत क्षेत्रातील लोकांना अधिक होतो. या योजनेत गुंतवणूक करून मोठा निधी उभारण्यासाठी Public Provident Fund मध्ये गुंतवणूक करू शकता. साधारणपणे 15 वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेची मॅच्युअरिटी पीरियड 15 वर्ष आहे. त्यानंतर तुम्ही या योजनेतून गुंतवणूक काढू शकता. 


अनेकदा Public Provident Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनात आपण मॅच्युअरिटी आधी पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकतो का, असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही 15 वर्षापेक्षाही कमी कालावधीत पैसे काढू शकता. मात्र, एखाद्या आपात्कालीन स्थितीत तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता. यामध्ये वैद्यकीय उपचार, मुलीचा विवाह, मुलांचे शिक्षण आदी कारणांस्तव तुम्ही पैसे काढू शकता. 


पैसे केव्हा काढता येतील?


पीपीएफ खात्यातील नियमांनुसार, (PPF Withdrawal Rules) कोणतीही व्यक्ती गुंतवणुकीच्या सहा वर्षानंतर रक्कम काढू शकते.


किती पैसे काढता येतील?


पीपीएफच्या नियमांनुसार, तुम्ही गुंतवणुकीच्या सहा वर्षानंतर पैसे काढू शकता. तुमच्या पीपीएफ खात्यात जमा असलेल्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येऊ शकते. खात्यातून पैसे काढल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही. 


पीपीएफ गुंतवणुकीचे फायदे


- या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर 7.10 टक्क्यांनी व्याज मिळते. दर तीन महिन्यानंतर या व्याज दराबाबत फेरआढावा घेऊन नवीन व्याज दर जाहीर केले जातात. 
- पीपीएफ योजनेत तुम्ही एका आर्थिक वर्षात कमीत कमी 500 रुपये आणि अधिकाधिक 1.5 लाखापर्यंतची गुंतवणूक करू शकता. 
- या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर खात्याच्या 80 सी नुसार कर सवलत मिळते. 
- 15 वर्षाच्या गुंतवणुकीतून तुम्ही एक चांगला फंड उभा करू शकता. 


EPFO चे डिजिटायझेशन


दरम्यान, देशातील वाढत्या डिजिटायझेशनसोबतच EPFO ​​ने देखील आपल्या सर्व सुविधांचे डिजिटायझेशन केले आहे. EPFO आपल्या खातेदारांना सात लाख रुपयांचा पूर्ण लाभ देते, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. EPFO ​​खातेधारकांना 7 लाख रुपयांचा लाभ मिळवायचा असेल, तर ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.


सात लाख रुपयांचा फायदा कसा मिळेल?


कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजनेअंतर्गत EPFO ​​प्रत्येक खातेदाराला सात लाख रुपयांचे विमा संरक्षण देते. जर एखाद्या खातेदाराचा अपघातात मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत नॉमिनीला सात लाख रुपयांचा पूर्ण लाभ मिळू शकतो. तो EDLI विमा योजनेंतर्गत सहजपणे दावा करू शकतो. पीएफ खातं असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ई-नॉमिनेशन बंधनकारक करण्यात आलं आहे. जेणेकरून खातेदाराला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध सुविधा त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनीला देता येईल. पीएफमधील सामाजिक सुरक्षा संबंधित सुविधेचा लाभ नॉमिनीला दिला जाऊ शकतो.


इतर महत्त्वाच्या बातम्या: