LIC Jeevan Saral Pension: निवृत्तीनंतरचे आयुष्य व्यक्तीकडे किती जमा भांडवल आहे, यावर अवलंबून असतं. प्रत्येक समजूतदार माणूस नोकरीला लागताच निवृत्तीसाठी थोडीफार गुंतवणूक करू लागतो. तुम्हालाही निवृत्तीनंतर आरामात आणि कोणत्याही त्रासाशिवाय जगायचे असेल, तर तुम्ही एलआयसीच्या जीवन सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला वयाच्या 60 नंतर फिक्स पेन्शन मिळते.


एलआयसी सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर 12 हजार रुपये पेन्शनची सुविधा मिळते. या योजनेद्वारे तुम्हाला किती पेन्शन मिळेल, ते तुम्ही यात एकरकमी किती पैसे गुंतवता यावर अवलंबून आहे. तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा, तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभरात पेन्शन मिळू शकते. चला तर जाणून घेऊ या योजनेत गुंतवणूक करण्याचे मार्ग आणि त्याचे फायदे.


ही योजना एक Standard Immediate Annuity वार्षिकी योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे पर्याय मिळतात. पहिल्या पर्यायामध्ये, तुम्ही तुमच्या जोडीदाराला (पती किंवा पत्नी) तुमच्यासोबत समाविष्ट करू शकता. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शनची सुविधा मिळत राहते. दुसऱ्या पर्यायामध्ये, तुम्ही एकरकमी पैसे जमा करून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला जमा केलेले पैसे मिळतील. जर तुम्ही दरमहा पेन्शन मिळवण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला दरमहा 1000 रुपये मिळतील. तीन महिन्यांसाठी 3,000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6,000 रुपये आणि एका वर्षासाठी 12,000 रुपये पेन्शन मिळेल.


दरम्यान, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय 40 ते 80 वर्षांच्या दरम्यान असावे. पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती आवडली नाही, तर तुम्ही ती खरेदी केल्यानंतर 6 महिन्यांनंतर सरेंडर करू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर तुम्हाला एकूण जमा केलेल्या रकमेपैकी 95 टक्के परत मिळेल. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळील शाखेत जाऊन पेन्शन पॉलिसी घेऊ शकता.


इतर महत्त्वाच्या बातम्या: