NPS Withdrawal Rule change from 1st January : नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार आहे. वास्तविक नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ग्राहकांसाठी आंशिक पैसे काढण्याचा नियम बदलणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच पीएफआरडीएने याबाबत नवा आदेश जारी केला आहे.
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट (PFRDA) अनुसार सर्व सरकारी क्षेत्रातील अर्थात केंद्र, राज्य आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या ग्राहकांना आता आंशिक पैसे काढण्यासाठी त्यांचा अर्ज फक्त त्यांच्या नोडल ऑफिसरकडे सबमिट करावा लागेल.
सेल्फ डिक्लेरेशनमधून अंशत: पैसे काढण्याच्या ऑनलाइन विनंतीला परवानगी होती
जानेवारी 2021 मध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटने (PFRDA) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एनपीएस सदस्यांकडून आंशिक पैसे काढण्यासाठी ऑनलाइन विनंतीला स्वयंघोषणा द्वारे परवानगी दिली होती. त्यावेळी असे सांगण्यात आले होते की कोविड महामारीचा सामना करण्यासाठी विशेष शिथिलता म्हणून ग्राहकांना स्वयं-घोषणाद्वारे आंशिक पैसे काढण्याची परवानगी दिली जात आहे.
पीएफआरडीएने परिपत्रक जारी केले
पेन्शन फंड रेग्युलेटरने (PFRDA) 23 डिसेंबर
2022 च्या परिपत्रकात जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार, कोरोना महामारीशी संबंधित नियम रद्द केल्यानंतर आणि लॉकडाऊन नियम शिथिल केल्यानंतर, सर्व सरकारी क्षेत्रातील ग्राहकांना (केंद्र, राज्य आणि केंद्रीय स्वायत्त संस्था) ) एनपीएस (NPS) मधून आंशिक पैसे काढण्यासाठी त्यांची विनंती त्यांच्या संबंधित नोडल कार्यालयात सादर करावी लागेल असं सांगण्यात आलं आहे.
NPS मध्ये आंशिक पैसे काढण्याचे नियम काय आहेत?
>> APS मध्ये किमान 3 वर्षे गुंतवणूक करा
>> ग्राहकांच्या एकूण योगदानातून 25% पैसे काढणे
>> सदस्यता कालावधीत 3 वेळा पैसे काढणे शक्य आहे
>> काही महत्त्वाच्या कारणांमुळे आंशिक पैसे काढणे शक्य आहे
नॅशनल पेन्शन स्कीममधून पैसे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रं
- पॅन कार्डची फोटो कॉपी
- रद्द केलेला चेक (Cancelled चेक)
- राष्ट्रीय पेन्शन स्कीम सारख्या मिळालेल्या रकमेची पावती
- तुमचा आयडी जसे की, आधार कार्ड, रेशन कार्ड