PPF Withdraw Rules:  सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही बहुतांशी लोकांची पसंतीची गुंतवणूक योजना आहे. या योजनेत जोखीम मुक्त गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याशिवाय, ही गुंतवणूक योजना करमुक्त आहे. त्यामुळे चांगल्या परताव्यासह कर सवलतीचा फायदा मिळतो. 


पीपीएफ योजनेची मॅच्युअरिटी 15 वर्षांची आहे. तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू इच्छिता तर ही गुंतवणूक योजना फायदेशीर आहे. पीपीएफ मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.


जर, तुम्हाला मुदतीआधीच पीपीएफमधील रक्कम काढायची असेल तर काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे. पीपीएफ योजनेतून मुदतीपूर्वीच तुम्हाला रक्कम काढता येणार नाही. त्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. 


पीपीएफ गुंतवणूक योजनेचा कालावधी हा आर्थिक वर्षापासून मोजला जातो. जर तुम्ही 15 जून 2010 पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल तर मॅच्युअरिटी ही एक एप्रिल 2026 रोजी होईल. 15 वर्षाच्या मुदतीनंतरही तुम्ही 5 वर्षे ही रक्कम तशीच ठेवू शकता. या पाच वर्षाच्या कालावधी दरम्यान, तुम्हाला दरमहा प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही. 


ज्या वर्षापासून सुरुवातीचे पीपीएफमधील योगदान दिले होते त्या वर्षापासून तुम्ही सात वर्षांनंतर तुमच्या PPF खात्यातील 50 टक्के रक्कम काढू शकता. पैसे काढण्यासाठी, तुम्हाला पीपीएफ पासबुक आणि बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.


जर तुम्ही तुमचे पीपीएफ खाते 15 वर्षांची मुदत संपण्यापूर्वी बंद केले, तर एकूण रक्कम अटींनुसार दिली जाईल. मात्र, ही रक्कम व्याजदरात कपात करून दिली जाईल.


PPF विथड्रॉल रेग्युलेशन 2021 अंतर्गत, खात्यातील शिल्लक रकमेवर उपलब्ध कर्जाची रक्कम बदलली आहे. मूळ PPF काढण्याच्या अटींनुसार, तुम्ही सुरुवातीच्या ठेवीच्या तिसऱ्या आर्थिक वर्षात दोन टक्के व्याज देऊन तुमच्या PPF खात्यातून कर्ज मिळवू शकता. आता 2021 साठी PPF काढण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ते 1 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.


PPF खाते काढण्याच्या नियमांतर्गत, तुम्हाला फॉर्म सी सबमिट करावा लागेल, जो बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असेल. फॉर्ममध्ये, तुम्हाला खाते क्रमांक आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम नमूद करावी लागेल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: