LIC New Insurance Policy : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची आणि विश्वासी जीवन विमा कंपनी एलआयसी (LIC) म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation). एलआयसी येत्या काही महिन्यांत तीन ते चार नवीन विमा पॉलिसी आणण्याच्या तयारीत आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नवीन पॉलिसीच्या प्रीमियममध्ये दुप्पट वाढ होण्यासाठी यामुळे मदत होईल, असं LIC नं म्हटलं आहे. एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन योजना
मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन योजना आणणार आहे. एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितलं की, आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढीचा अंदाज घेत आहोत. अलीकडील ट्रेंडमध्ये वैयक्तिक रिटेलमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आम्ही हे लक्ष्य साध्य करू. एलआयसी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक नवीन सेवा सुरू करणार आहे. याला बाजारात चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
आयुष्यभर विम्याच्या रकमेच्या 10 टक्के रक्कम लाभ
नवीन सेवा योजनेबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितलं की, या योजनेतून निश्चित परतावा मिळेल आणि ही योजना पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला संपूर्ण आयुष्यासाठी विम्याच्या रकमेच्या 10 टक्के रक्कम मिळेल. 20 ते 25 वर्षांनंतर आपण किती पैसे देतो आणि किती परतावा मिळेल हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे असल्याने नवीन सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कर्ज आणि मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा
एलआयसीच्या आगामी नव्या योजनेमध्ये कर्ज सुविधा आणि मुदतपूर्व पैसे काढण्याची सोय मिळेल. चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत उत्पन्न (Personal) विभागातील एलआयसीचा नवीन पॉलिसी प्रीमियम 2.65 टक्क्यांनी वाढून 25,184 कोटी रुपये झाला आहे. हा प्रीमियल गेल्या वर्षी याच कालावधीत 24,535 कोटी रुपये होता. नवीन पॉलिसी प्रीमियम हा जीवन विमा कराराच्या पहिल्या पॉलिसी वर्षात देय असलेला विमा प्रीमियम किंवा पॉलिसीधारकाने केलेले एकरकमी पेमेंट आहे.
फक्त एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
एलआयसीच्या सरल पेन्शन स्कीममध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते. गुंतवणुकदार स्वत: पुरतं अथवा जोडीदाराच्या नावाने सरल पेन्शनमध्ये गुंतवणूक करू शकतात. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :