LIC HFL : घर खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या कमाईतून एक घर खरेदी करावे अशी इच्छा प्रत्येकाची असते. मात्र, उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लक्षात घेता स्वप्न पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होतात. घर, जमीन खरेदी करण्यासाठी गृह कर्ज घ्यावेच लागते. तुम्ही घर खरेदी करण्याचे नियोजन करत असाल तर LIC ची एक खास योजना आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स (LIC Housing Finance Limited)स्वस्त व्याज दरावर गृह कर्ज देण्याची घोषणा केली आहे.  LIC Housing Finance Limited कडून गृह कर्ज घेतल्यास तुम्हाला किमान व्याज दर 6.66 टक्के असेल. 


LIC HFL ने जुलैमध्ये 50 लाखापर्यंतच्या गृह कर्जासाठी 6.66 टक्के व्याज दर देण्याची घोषणा केली होती. कंपनीकडून वेगवेगळ्या दरावर  कमी सिबिल स्कोअर असणाऱ्यांना गृह कर्ज देत आहे. जर, तुम्ही संयुक्तपणे गृह कर्ज घेत असाल तर ज्याचा अधिक सिबिल स्कोअर गृहीत धरला जाणार आहे. 


कर्ज घेण्यास कोण पात्र?


LIC HFL नुसार, कोणतीही नोकरी, व्यवसाय करत असलेले  गृह कर्ज घेण्यास पात्र आहे. ज्यांचा  CIBIL Score 700 हून अधिक आहे, त्यांना कर्ज घेण्याची सुविधा आहे. 


जर तु्म्ही LIC HFL कडून गृह कर्ज घेण्यासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला घराच्या किमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते.  जर तुम्ही 30 ते 75 लाखांच्या कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला मालमत्ता किंमतीच्या 80 टक्के कर्ज दिले जाईल.  जर, 75 लाखांहून अधिक कर्ज घेत  असाल तर मालमत्ता किंमतीच्या 75 टक्के कर्ज मिळेल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: