LIC Dhan Ratna Plan : भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC - Life Insurance Corporation) ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा पॉलिसी कंपनी आहे. एलआयसीकडून वेळोवेळी देशातील प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या योजना (LIC Policy) सुरू करण्यात येतात. तुम्हीही अशीच काही गुंतवणूक योजना करण्याचा विचार करत असाल तर एलआसीच्या (Life Insurance Corporation) या योजनेबाबत जाणून घ्या. एलआयसीच्या धन विमा रत्न योजनेमध्ये (LIC Dhan Ratna Plan) गुंतवणूक केल्यास तुमच्या सुरक्षेसह बचतही होईल. या प्लॅनमध्ये तुम्हांला दुप्पट पट परतावा देखील मिळू शकतो. यासोबतच या पॉलिसीमध्ये एकूण तीन फायदे उपलब्ध आहेत. जाणून घ्या काय आहे, ही योजना, वाचा सविस्तर...


एलआयसी धन रत्न विमा योजना


एलआयसीच्या (LIC) धन रत्न योजनेत (LIC Dhan Ratna Plan) गुंतवणूक करून, तुम्ही तुमच्या ठेवीच्या 10 पट पैसे मिळवू शकता. एवढेच नाही तर या योजनेमध्ये तुम्हाला तीन फायदे मिळतील. यामध्ये तुम्हाला मनी बॅक, गॅरंटीड बोनस आणि डेथ बेनिफिट असे तीन मोठे फायदे मिळतील.


काय धन रत्न विमा योजना?


या योजनेध्ये तुम्हाला पॉलिसीच्या मुदतीनुसार फायदे मिळतील. या पॉलिसीची मुदत 15 वर्षांपर्यंत आहे. पॉलिसीच्या तेराव्या आणि चौदाव्या वर्षी 25 टक्के रक्कम तुम्हाला परत केली जाते. तसेच 20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला 18 व्या आणि 19 व्या वर्षात 25 टक्के रक्कम परच केली जाते. 25 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 23 आणि 24 व्या वर्षी तुम्हाला 25 टक्के रक्कम परत मिळेल. या पॉलिसीमध्ये, तुम्हाला पहिल्या पाच वर्षांत 1000 रुपयांवर 50 रुपयांचा बोनस मिळेल. त्यानंतर पुढील पाच वर्षांत म्हणजे, 6 ते 10 वर्षांमध्ये 55 रुपये बोनस मिळेल. मॅच्युरिटीच्या वेळेपर्यंत हा बोनस प्रति हजारांवर रुपये 60 इतका असेल.


धन रत्न विमा योजनेबाबत काही महत्वाच्या गोष्टी 



  • LIC धन बीमा रत्न योजनेतील गुंतवणुकीसाठी व्यक्तीचे किमान वय 90 दिवस आहे.

  • या योजनेचे कमाल वय 55 वर्षे आहे. या योजनेत किमान पाच लाख रुपये परतावा दिला जातो.

  • धन विमा रत्न योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पेमेंट करता येते.

  • जर तुम्ही ही पॉलिसी 15 वर्षांच्या मुदतीसाठी किमान पाच लाख रुपयांसह विमा उतरवली तर, पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत तुम्हाला एकूण 9,12,500 रुपये मिळतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Jeevan Azad policy: LIC च्या 'या' योजनेचा देशात बोलबाला; 15 दिवसांत 50 हजारांहून अधिक पॉलिसी विकल्या