Jeevan Azad Policy: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Life Insurance Corporation) च्या जीवन आझाद पॉलिसीला (Jeevan Azad Policy) मोठा प्रतिसाद मिळतोय. LIC कडून लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 10-15 दिवसांत 50,000 जीवन आझाद पॉलिसी विकल्या आहेत. एलआयसीचे (LIC) अध्यक्ष एमआर कुमार यांनी व्हर्च्युअल प्रेस मीटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. जीवन आझाद पॉलिसी ही नॉन पार्टिसिपेटिंग  विमा योजना आहे. एलआयसीनं जानेवारी 2023 मध्ये ही पॉलिसी लान्च केली. एलआयसी सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना चालवते. देशातील लाखो लोकांनी एलआयसीच्या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.


हमखास परतावा मिळेल


जर एखादा गुंतवणूकदार 18 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी निवडतो, तर त्या व्यक्तीला फक्त 10 वर्षांसाठी (18-8) प्रीमियम भरावा लागतो. पॉलिसी मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम देण्याची हमी या योजनेतंर्गत मिळते. या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 2 लाख रुपये आणि कमाल विमा रक्कम 5 लाख रुपये आहे. ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांसाठी घेतली जाऊ शकते.


ही पॉलिसी कोण घेऊ शकते?


एखादी 30 वर्षांची व्यक्ती 18 वर्षांसाठी जीवन आझाद योजना घेते. तो 2 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी 10 वर्षांसाठी 12,038 रुपये जमा करतो. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, 'मूलभूत विमा रक्कम' किंवा पॉलिसी घेताना निवडलेल्या वार्षिक प्रीमियमच्या सातपट नॉमिनीला दिले जातील. दरम्यान, मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेले एकूण प्रीमियम 105 टक्क्यांपेक्षा कमी नसावेत, अशी एक अट यासाठी घालण्यात आली आहे. 


90 दिवस ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. एलआयसीची ही योजना घेणारा पॉलिसीधारक वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकतो. पॉलिसीधारकांना मॅच्योरिटी पूर्ण झाल्यावर गॅरेंटीड रिटर्न मिळतो.


एलआयसीचा नफा


एमआर कुमार म्हणाले की, एलआयसी गैर-सहभागी विम्यासारख्या हमी योजनांवर लक्ष केंद्रित करतेय. कारण ते पॉलिसीधारकांना हाय मार्जिन देतात. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत LIC चा निव्वळ नफा वाढला आहे. एलआयसीनं डिसेंबरच्या तिमाहीत नफ्यात 6,334 कोटी रुपयांची मोठी वाढ नोंदवली आहे. वर्षभरापूर्वीच्या कालावधीत ते 235 कोटी रुपये होते. LIC चे निव्वळ प्रीमियम उत्पन्न देखील Q3FY22 मध्ये 97,620 कोटी रुपयांच्या तुलनेत Q3FY23 मध्ये 1.1 लाख कोटी रुपये झाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


LIC Policy: 'या' योजनेत गुंतवणूक केल्यानं मुलांचं भविष्य होईल सुरक्षित; मॅच्युरिटीवर मिळेल मोठा परतावा