Gratuity Rules: तुम्ही जर नोकरी करत असाल तर कंपनीकडून कर्मचाऱ्याला त्याच्या दीर्घ कालावधीसाठी केलेल्या उत्कष्ट कामासाठी देण्यात येणाऱ्या ग्रॅच्यूटीबाबत काही नियम माहित असणं गरजेचं आहे. ग्रॅच्यूटी हे कंपनीनं दिलेलं बक्षीस आहे जे कर्मचाऱ्याच्या दीर्घकाळ कामाची पोचपावती असते. नियमांनुसार जेंव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत पाच वर्षे सलग काम करता तेंव्हा तुम्ही ग्रॅच्यूटीसाठी पात्र होता. आता जर एखाद्या कर्मचाऱ्यानं 4 वर्षे 11 महिन्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला किंवा निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तर तो ग्रॅच्यूटीसाठी मुकणार? पण 5 वर्ष काम केल्यानंतर मिळणाऱ्या ग्रॅच्यूटीच्या नियमालाही काही अपवाद आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं कंपनीत 4 वर्ष 11 महिने काम केलं असेल तर पाच वर्षे पूर्ण होण्यास एखादाच महिना राहिला असेल तर ग्रॅच्यूटी मिळते का? पाहूया..
ग्रॅच्यूटीच्या नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्यानं 4 वर्षे 8 महिने काम केलं असेल तर त्या कर्मचाऱ्याची सेवा 5 वर्षांएवढीच मानली जाते. आणि त्या कर्मचाऱ्याला 5 वर्षानुसार ग्रॅच्यूटीची रक्कम दिली जाते. परंतू जर नोकरी या कालावधीपेक्षा कमी असेल म्हणजेच 4.7 किंवा 4.8 वर्षे तर त्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्यूटी दिली जाणार नाही.
ग्रॅच्यूटी देताना नोटीस कालावधी मोजतात का?
होय. ग्रॅच्यूटीचा कालावधी मोजताना कर्मचाऱ्याला नोटीस कालावधी पूर्ण करणं बंधनकारक असतं. ग्रॅच्यूटीसाठी हा कालावधीही मोजला जातो. समजा तुम्ही 4 वर्षे 6 महिन्यांनी राजीनामा दिला आणि तुमचा नोटीस पिरियड दोन महिन्यांचा असेल तर तुमचा नोटीस कालावधी मोजला जातो. त्यामुळे तुमचा नोकरीचा कालावधी 4.8 वर्षांचा होतो आणि पाच वर्षांच्या हिशेबाने ग्रॅच्यूटी मिळते.
नोकरदाराचा मृत्यू झाल्यास काय होते?
ग्रॅच्यूटीच्या पाच वर्षांच्या कालावधीच्या नियमाला या केसमध्ये अपवाद आहे.जर कर्मचाऱ्याचा काम करताना मृत्यू झाला तर ग्रॅच्यूटीचा पाच वर्षांचा नियम लागू होत नाही. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर ग्रॅच्यूटीची संपूर्ण रक्कम कर्मचाऱ्यानं नेमून दिलेल्या नॉमिनीला मिळते.
ग्रॅच्यूटीची रक्कम कशी ठरवतात?
ग्रॅच्युइटीची रक्कम ठरवण्यासाठी एक सूत्र आहे. (अंतिम वेतन) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) x (15/26). शेवटचा पगार म्हणजे तुमच्या शेवटच्या 10 महिन्यांच्या पगाराची सरासरी. या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता आणि कमिशनचा यात समावेश असतो. यात एका महिन्यात 4 रविवार म्हणजेच सुट्टीचे वार वगळले जातात. आणि 26 दिवसांचीच ग्रॅच्यूटी मोजली जाते.
हे ही वाचा:
या आठवड्यात पडणार पैशांचा पाऊस? तब्बल 11 आयपीओ गुंतवणुकीसाठी येणार; पैसे ठेवा तयार!