Financial Investment Products : तुम्ही स्वत: साठी आर्थिक पाठबळ उभे करण्यासह आयुष्यात अचानकपणे येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यासाठीची तयारी करत असाल तुम्हाला एक आर्थिक नियोजन करावे लागेल. याद्वारे तुम्हाला तुमची वेगवेगळी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करतील. अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार करून महागाईला लक्षात घेऊन गुंतवणूक योजना असावी. आर्थिक नियोजनामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी, मुलांचे उच्च शिक्षण, त्यांचे लग्न ते सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन आदी उद्दिष्टे साध्य करता येतील. त्याशिवाय हे आर्थिक नियोजन तुम्हाला अकाली मृत्यू, गंभीर आजार, अचानक नोकरी गमावणे, आदी अशाप्रकारच्या अनपेक्षित संकटांना तुम्हाला अथवा तुमच्या कुटुंबीयांना सामोरे जाण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार ठेवते.  


ज्यांनी नुकताच आर्थिक प्रवास सुरू केला आहे, त्यांच्यासाठी निवडी आणि पर्याय सुरुवातीच्या टप्प्यात उत्साही असू शकतात. मात्र, ज्यावेळी तुम्ही तुमच्या स्वतःच्या आर्थिक नियोजनाची सुरुवात करत असता त्यावेळी तुम्हाला गुंतवणुकीसाठीचे असलेले सर्व पर्यायांची माहिती, त्यांचे महत्त्व समजून घेणे थोडं कठीण असू शकते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला काही गुंतवणुकीच्या पर्यायांची शिफारस करत आहोत. 


आपात्कालीन निधी (Emergency Fund)


तुमच्या तीन ते सहा महिन्यांचा खर्च भागेल एवढा किमान निधी तुमच्या आपात्कालीन निधीमध्ये (Emergency Fund) असावा. हा निधी बचत म्हणून किंवा गुंतवणुकीच्या स्वरुपात असावा. तुमच्याकडे आपात्कालीन निधी नसल्यास अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत तुम्हाला तुमची गुंतवणूक नाईलाजाने मोडावी लागेल. अशा वेळी तुम्हाला पेनल्टी म्हणून काही रक्कम द्यावी लागेल. कोविड-19 महासाथीच्या काळात आपात्कालीनी निधीचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले होते. तुम्हाला आपात्कालीन निधीसाठी एक शिस्तबद्ध बचत आणि गुंतवणुकीद्वारे हा निधी तयार करावा लागेल. यासाठी तुम्ही लिक्विड फंडचा पर्याय निवडू शकता. हा फंड मनी मार्केट सिक्युरीटीमध्ये गुंतवला जातो आणि याचा मॅच्युअरिटी कालावधी 91 दिवसांचा असतो. 


टर्म इन्शुरन्स 


आपल्यावर कुटुंबीयांचे आर्थिक अवलंबित्व असल्यास, आपल्या पश्चात कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी टर्म इन्शुरन्स अतिशय आवश्यक आहे. तुम्ही कमी वयात आणि दीर्घकालीन मुदतीसाठी टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. तुमच्या दुर्देवाने तुमचे आकस्मिक निधन झाल्यास तुमच्या कुटुंबीयांना या टर्म इन्शुरन्समुळे आर्थिक आधार मिळेल. ही दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने तुम्ही यासाठीचा प्रीमियम रक्कम, विम्याची रक्कम, पॉलिसीचा कार्यकाळ, योजनेतील अतिरिक्त लाभ आदीसारखे घटक समजून घेणे गरजेचे आहे.  एचडीएफसी लाइफ क्लिक 2 ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने https://www.hdfclife.com/term-insurance-plans/click-2-protect-life या लिंकवर खरेदी करू शकता. या टर्म इन्शुरन्समुळे तुमच्या निधनानंतर तुम्ही ठरवलेल्या नॉमिनीला/ वारसाला एक मोठी रक्कम मिळेल. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या जवळपास 20 पट ही विम्याची रक्कम असावी. 


या टर्म इन्शुरन्समध्ये तुमच्या गरजा लक्षात घेऊन तीन पर्याय उपलब्ध आहेत. Life and Rebalance हा पहिला पर्याय असून पहिल्या भागात जीवन विमा (Life Cover ) फायदा मिळतो. तर, दुसरा भाग हा एखाद्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागल्यास फायदेशीर ठरू शकतो. टर्म इन्शुरन्समधील दुसरा पर्याय हा सामान्य जीवन विम्यासारखा आहे. या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला एकरक्कमी विम्याचे पैसे मिळतात. तिसरा पर्याय हा तुम्हाला पॉलिसीच्या मुदतीत तुम्हाला विमा संरक्षण देतो. त्याशिवाय वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत विमा रक्कमेच्या 0.1 टक्के रक्कम मासिक लाभ म्हणून विमा रक्कमेत दिली जाते. तुमची पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्याचा फायदा मिळतो. या पॉलिसीचा प्रीमियमदेखील मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक तत्वावर भरता येऊ शकतो. 


आरोग्य विमा (Health Insurance)


आरोग्य विमा हा तुमच्या पोर्टफोलिओमधील आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. अचानकपणे तुम्हाला अपघात किंवा आजारपणाला सामोरे गेल्यास त्याचा खर्च या विम्यातून करता येतो. त्यामुळे तुम्हाला आर्थिक भार सहन करावा लागत नाही. आरोग्य सेवा महागडी होत असल्याने आरोग्य विमा घेण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या बजेटनुसार तुम्ही कुटुंबासाठी एका चांगल्या रक्कमेचा आरोग्य विमा घेऊ शकता. 


पीपीएफ 


तुमच्या आर्थिक गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी 'पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड' हा एक उत्तम पर्याय आहे. प्रत्येक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत पीपीएफचा समावेश असावा. गुंतवणुकीला सरकारची हमी असून करसवलतही मिळते. पीपीएफच्या गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज दराने परतावा मिळतो. निवृत्ती काळातील आर्थिक पाठबळासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने पीपीएफ फायदेशीर आहे. 


म्युच्युअल फंड


पारंपरीक गुंतवणूक योजना या महागाईच्या काळात तुम्हाला फायदेशीर ठरू शकत नाही. त्याशिवाय जर तुमच्याकडे तुमचे आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ नाही. मात्र, तरीदेखील तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून हे उद्दिष्ट साध्य करू शकता. म्युच्युअल फंड हे इक्विटीसह विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. काही म्युच्युअल फंड हे फक्त इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात. तर, काही म्युच्युअल फंड इक्विटीसह इतर वैविध्यपूर्ण गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही तुमची अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 


राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme)


राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) ही निवृत्तीनंतर पैसे असावेत यासारख्या दीर्घकालीन गुंतवणूक उद्दिष्टांसाठी फायदेशीर आहे. ही योजना तरुण गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देऊ शकते. एनपीएसदेखील इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे चांगला परतावा मिळू शकतो. एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यास तुम्हाला आठ फंड मॅनेजर्सचा पर्याय उपलब्ध आहे. या गुंतवणूक पर्यायाच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यातील आर्थिक चिंता  मुक्त व्हाल.