Investment Tips : सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. काही योजनांमध्ये अगदी कमी गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. काही योजनांमध्ये तुम्हाला नियमित उत्पन्न देखील मिळू शकते. अशीच एक बचत योजना आहे. एक कप चहाच्या किंमतीपेक्षा कमी पैशांची गुंतवणूक तुम्हाला दरमहा पाच हजार रुपयांचे उत्पन्न देऊ शकते. 


ही गुंतवणूक योजना सरकारची योजना आहे. कमी गुंतवणुकीत चांगला परतावा देणारी योजना ही अटल पेन्शन योजना आहे. जर, तुमचे वय 18 वर्ष असेल तर दररोज किमान 7 रुपयांची दरमहा गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा 5000 रुपये मिळू शकतात. अटल पेन्शन योजना असे या योजनेचे नाव आहे. 


मासिक गुंतवणूक किती असेल?


PFRDA च्या तक्त्यानुसार, अटल पेन्शन योजनेचा चार्ट पाहिला तर तुम्ही 18 वर्षांचे असताना गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला दरमहा किमान 210 रुपये गुंतवावे लागतील. याचा अर्थ दररोज 7 रुपये वाचवून तुम्ही 210 रुपये जमा करू शकता. वयाच्या 60 वर्षांनंतर म्हणजे निवृत्तीनंतर गुंतवणुकीची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरमहा 5000 रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.


मात्र, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला मासिक 376 रुपये गुंतवावे लागतील. वयाच्या 30 व्या वर्षी तुम्हाला 577 रुपये गुंतवावे लागतील आणि वयाच्या 35 व्या वर्षी तुम्हाला 902 रुपये मासिक गुंतवावे लागतील. तुम्ही त्यानुसार गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही 5000 रुपये मासिक पेन्शन मिळण्यास पात्र व्हाल.


अटल पेन्शन योजना कधी सुरू झाली?


अटल पेन्शन योजना केंद्र सरकार चालवते. ही हमी मासिक पेन्शन योजना आहे. त्याची सुरुवात 2015-16 मध्ये करण्यात आली. ही योजना कामगार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. यामध्ये 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंतचे पेन्शन दिले जाते. तसेच, तुम्ही यात वयाच्या 18 वर्षे ते 40 वर्षांपासून गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, 18-40 वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात. ज्यांचे बचत खाते कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे. या योजनेअंतर्गत पाच पेन्शन स्लॅब आहेत. एक हजार रुपये, दोन हजार रुपये, तीन हजार रुपये, चार हजार रुपये आणि पाच हजार रुपये. जेव्हा ग्राहक 60 वर्षांचा होतो, तेव्हा सरकार त्याला निवडलेल्या पेन्शन स्लॅब नुसार पेन्शन देते. ग्राहकांच्या मृत्यूनंतर, नामांकित व्यक्तीला पेन्शन दिली जाते. या योजनेत तुम्हाला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.