PM Suraksha Bima Yojana : देशात आजही आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे अनेकांना जिवन विमा काढता येत नाही. अशातच एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर कुटुंबाला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागतो. त्यांना आर्थिक परिस्थितीचाही सामना करावा लागतो. त्यामुळेच आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं एक योजना आणली. केंद्र सरकारच्या त्याच महत्वांक्षी योजनेबद्दल आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, असे त्या योजनेचं नाव आहे.  2015 मध्ये केंद्र सरकारकडून या योजनेला सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनामध्ये (pmsby) तुम्ही कमी प्रीमियम रक्कम भरुन दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा घेऊ शकतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाबद्दल जाणून घेऊयात... (Utility News In Marathi)


दुर्घटना झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाअंतर्गत आर्थिक मदत मिळती. यामध्ये ऑटो डेबिटमार्फत प्रीमियमची रक्कम एक जून रोजी तुमच्या खात्यामधून कट होते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वैधता पुढील वर्षी 31 मे पर्यंत असते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला दुर्घटनेत अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची रक्कम दिली जाते.  जर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सरकारकडून दोन लाख रुपये दिले जातात. 


महत्वाचं म्हणजे, नैसर्गिक आपत्तींमुळे झालेला कोणताही मृत्यू, अपघात आणि अपंगत्व या पॉलिसीद्वारे कव्हर केले जाते. पण, या योजनेत आत्महत्या विरूद्ध कोणताही लाभ दिला जात नाही. परंतु हत्येमुळे मृत्यू झाल्यास पॉलिसी अंतर्गत लाभ मिळतो. एक हात किंवा पाय गमावण्याच्या दृष्टीने नुकसान न झाल्यास ही योजना कोणत्याही कव्हरेज प्रदान करत नाही.  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास... तुम्हाला अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्याशिवाय तुम्ही बँकमध्ये जाऊनही ही योजना घेऊ शकतात. बँक बचत खाते असलेले 18-70 वयोगटातील भारतीय व्यक्ती केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची सदस्यता घेऊ शकतात. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बचत खाते असल्यास तुम्ही फक्त एक बचत बँक खाते वापरून योजनेची सदस्यता घेऊ शकता.  


आणखी वाचा :
Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेचे अनेक फायदे, एकदा करा गुंतवणूक महिन्याला मिळेल परतावा
Home Loans : गृहकर्ज घेत आहात? किती प्रकारची गृहकर्ज आहेत एकदा वाचा, कदाचित फायदा होईल