Home Loan EMI Burden : मुंबई (Mumbai) ही अनेकांसाठी स्वप्ननगरी आहे. या मायानगरीत छोटसं का होईना स्वत:चं घर असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. काबाडकष्ट आणि मेहनत करुन अनेक जण कर्ज (Home Loan) काढून स्वप्नातलं घर घेतात आणि मग ईएमआय (EMI) भरतात. आता एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे की, मुंबईकर 51 टक्के उत्पन्न ईएमआय भरण्यासाठी खर्च करत आहेत. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, ही बाब समोर आली आहे. या रिपोर्टनुसार, आर्थिक विकासात वाढ झाल्याने आणि व्याजदरात कपात झाल्याने लोकांची EMI भरण्याची क्षमता वाढेल.


निम्म्याहून जास्त उत्पन्न EMI वर खर्च


मुंबईकरांच्या उत्पन्नातील निम्म्याहून जास्त हिस्सा होम लोनच्या ईएमआयवर खर्च होत आहे. रिअल इस्टेट कन्सलटेंट नाइट फ्रँक इंडियाने प्रोप्राइटरी अफोर्डेबिलिटी इंडेक्स (Knight Frank India’s Proprietary Affordability Index) संदर्भात एक अहवाल जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, मुंबई देशातील सर्वात महागडं रेसिडेन्शियल मार्केट (Residential Market) आहे. नाईट फ्रँकच्या रिपोर्टनुसार, मुंबईचा अफॉर्डेबलिटी इंडेक्समधील (Affordability Index) 50 टक्क्यांहून जास्त रक्कम गृहकर्जाच्या हफ्त्यांवर (Home Loan EMI) खर्च होते.  


उत्पन्नाच्या 51 टक्के रक्कम गृहकर्ज EMI पेमेंटवर खर्च


निवासी बाजारपेठेत (Residential Market) मुंबईतील घर खरेदीदार त्यांच्या उत्पन्नाच्या 51 टक्के रक्कम गृहकर्ज EMI पेमेंटवर खर्च करत आहेत. कर्ज स्वस्त झाल्यास EMI पेमेंटचं ओझं कमी होईल. 2023 मध्ये मुंबईतील घर खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या 51 टक्के EMI भरण्यासाठी खर्च करावा लागत आहे. दरम्यान, 2022 च्या तुलनेत 2023 वर्षात यामध्ये सुधारणा झाली आहे. 2022 मध्ये लोकांना त्यांच्या उत्पन्नाच्या 53 टक्के EMI भरण्यासाठी खर्च करावा लागला होता. पण, 2019 मध्ये कोरोना महामारीपूर्वी मुंबईचा परवडणारा निर्देशांक म्हणजेच अफॉर्डेबलिटी इंडेक्स (Affordability Index) 67 टक्के होता, म्हणजेच गेल्या चार वर्षांत परवडणाऱ्या निर्देशांकात 16 टक्क्यांची सुधारणा झाली आहे.